आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांची भेट घेतल्याने नितेश राणेंवर कारवाई करण्याची काँग्रेस आमदारांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार नितेश राणे यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली आहे. - Divya Marathi
आमदार नितेश राणे यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली आहे.

मुंबई- काँग्रेसचे आमदार असलेल्या नितेश राणे यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली आहे. पक्षविरोधी काम करत असल्याने त्यांना पक्षातून निलंबित करावे असा सूर पक्षात आहे. यापूर्वीही विधान परिषदेच्या निवडणुकीत नितेश राणे भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना नितेश राणे उघडपणे मतदान केल्याचे सांगितले होते. आता पुन्हा एकदा पक्षविरोधी कारवाया केल्याने आमदारांची नाराजी वाढली आहे.

 

नितेश राणे यांनी बुधवारी रात्री नवी दिल्लीत पिता नारायण राणेंसमवेत भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीदरम्यान राणे पिता-पुत्रांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आदी उपस्थित होते. सप्टेंबर 2017 मध्ये नारायण राणे काँग्रेस सोडल्यानंतर नितेश राणे तळ्यात-मळ्यात करत आहेत.

 

काँग्रेसने त्यांना आमदारकी सोडून निवडणुकीस सामोरे जाण्याचे आव्हान दिले होते. मात्र, नितेश राणेंनी योग्य वेळी निर्णय घेऊ असे सांगत याकडे दुर्लक्ष केले होते. यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी राणे पिता-पुत्रांवर हल्लाबोल करत, नितेश राणेंची गत पिता नारायण राणे यांच्याप्रमाणेच झाली असल्याची टीका केली होती.

 

नितेश राणेंवर कारवाई न करण्यामागे हे कारण-

 

नितेश राणेंवर कारवाई न करण्यामागे काँग्रेसची रणनिती आहे. नितेश राणेंवर कारवाई केली तर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद गमविण्याची भीती काँग्रेसला आहे. विधानसभेत काँग्रेसचे 43 आमदार आहेत. यात राणेंचे पुत्र नितेश व मुंबईतील कालिदास कोळबंकर हे दोन समर्थक आमदार आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीकडे 41 आमदार आहेत. त्यामुळे नितेश राणेंवर कारवाई केल्यास राष्ट्रवादी विरोधी पक्षनेत्यापदावर दावा करू शकते व भाजपही त्यांना मदत करेल या भीतीने काँग्रेस पक्ष नितेश राणेंवर कारवाई करण्यास कचरत आहे. 

 

अमित शहांची भेट घेतली नाही- नितेश राणे

 

दरम्यान, नितेश राणे यांनी यानंतर नमते घेतले आहे. आपण अमित शहा यांची भेट घेतली नाही. माझे पिता शहांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी मी गाडीत बसून होतो. एक आमदार म्हणून नव्हे तर एका मुलगा म्हणून पित्यासोबत गेलो होतो असे स्पष्टीकरण आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...