आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 12 जूनला मुंबई दौ-यावर, गोरेगावमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी येत्या 12 जूनला मुंबई दौ-यावर येत आहेत. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनल्यानंतरचा हा पहिलाच मुंबई दौरा आहे. या दौ-यात ते बुथ लेवलवरील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. गोरेगावमधील एक्जिबिशन सेंटरमध्ये राहुल यांची छोटेखानी सभा होईल. त्याच दिवशी सकाळी ते भिवंडी कोर्टात हजेरी लावणार आहेत.

 

राहुल गांधी यांनी डिसेंबर 2017 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले. त्यानंतर त्यांना मुंबई दौ-यावर यायचे होते मात्र त्याचे नियोजन होत नव्हते. अखेर 12 जूनचा मुहूर्त सापडला आहे. 

 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा बुधवारी मुंबई दौरा झाला. त्यानंतर आता राहुल गांधी मुंबई दौ-यावर येत आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...