आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशनात भाजप सरकारला धारेवर धरा : अशोक चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ४ जुलैपासून नागपूर येथे होऊ घातलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होऊन राज्य सरकारला धारेवर धरा, अशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस विधिमंडळ समन्वय समितीच्या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना केली. या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे, डी. पी. सावंत, अमर राजूरकर आदी उपस्थित होते. 


बुधवारी दुपारी विधानभवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात काँग्रेस विधिमंडळ समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. पक्षाच्या आमदारांना सूचना देताना चव्हाण म्हणाले, 'भाजप -शिवसेना युतीचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून जनतेमध्ये सरकारविरोधात तीव्र असंतोष आहे. राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर आक्रमक होऊन अधिवेशनात सरकारला धारेवर धरा,' असे निर्देश चव्हाण यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...