आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहन प्रकाश यांची उचलबांगडी; मल्लिकार्जुन खर्गेंची महाराष्ट्र काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांची महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या आदेशानुसार मोहन प्रकाश यांच्याजागी खर्गे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाचे सरचिटणीस अशोक गहलोत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मोहन प्रकाश जून 2013 पासून महाराष्ट्र राज्याचे प्रभारी म्हणून कार्यरत होते. 

 

खर्गे हे कर्नाटकमधील बिदर-गुलबर्गा येथील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना मराठी उत्तम भाषा बोलता येते तसेच त्यांना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची बारकाईने माहिती आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी खर्गे यांची नियुक्ती केल्याचे मानले जाते. दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी लवकरच नवी निवड होणार असल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या जागेवर पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची नावे आघाडीवर असल्याचे कळते. 

बातम्या आणखी आहेत...