आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरातत्त्वच्या मदतीने हाेणार रायगड किल्ल्याचे संवर्धन, करारासाठी केंद्राचा हिरवा कंदील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागासोबत लवकरच करार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात साेमवारी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत ‘पीएमअाे’चे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यासोबत बैठक झाली. ‘या कामाला गती देण्यासाठी पुरातत्त्व सर्वेक्षणचे काही अधिकारी राज्य शासनाकडे देण्याची मागणी मान्य करण्यात अाली.

 

बळीराजा चेतना अभियानास मंजुरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत मंजुरी दिली. यामुळे अभियानातील १०० प्रकल्पांच्या कामांना गती येईल. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्यासोबतच राज्यास अभियानासाठी या वर्षी केंद्राकडून आवश्यक निधी प्राप्त व्हावा अशी विनंती बैठकीत करण्यात आली. त्यासही मान्यता देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...