आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दंगल गर्ल’ झायरा वसीमची विमानात काढली छेड; 39 वर्षीय आरोपी अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई- दिल्ली-मुंबई मार्गावरील विमानात मागच्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशाने छेड काढल्याचा आरोप ‘दंगल’ चित्रपटातील अभिनेत्री झायरा वसीमने केला आहे. विस्तारा एअरलाइन्सच्या विमानात झायराच्या मागील सीटवर बसलेली ही व्यक्ती ५-१० मिनिटे तिचे खांदे, पाठ व मानेवर पाय घासत होती, असा झायराचा अारोप आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेती १७ वर्षीय झायराने विमानातून उतरताच रडत रडत इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओत ही माहिती दिली. तिने आर्मरेस्टवर ठेवलेल्या पायाचा फोटोही टाकला. दरम्यान, याप्रकरणी ३९ वर्षीय विकास सचदेव यास अटक करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलिस सूत्रांनी दिली. 

 

राज्य महिला आयोगाने दिले चौकशीचे आदेश
या प्रकारानंतर विस्तारा एअरलाइन्सने झायराची तातडीने माफी मागितली असून महाराष्ट्र महिला आयोगाने विमान नियामक प्राधिकरणास विमानातील क्रू सदस्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगानेही विस्तारा एअरलाइन्सला नोटीस बजावली अाहे. 

 

खऱ्या जीवनात धीट हो
प्रसिद्ध भारतीय महिला कुस्तिपटू गीता व बबिता फोगाट भगिनींनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करत खऱ्या जीवनातही धीट हो, असा संदेश झायराला दिला आहे. मी तुझ्या जागी असते तर छेड काढणाऱ्याला रडावे लागले असते, असे गीताने म्हटले आहे.

 

काय म्‍हटले झायराने?

-  शनिवारी रात्री विस्‍तारा एअरलाइन्‍सने दिल्‍ली ते मुंबई प्रवास करताना झायरासोबत ही घटना घडली. याबद्दल आपल्‍या इन्‍स्‍टाग्राम स्‍टोरीमध्‍ये झायराने लिहिले आहे की, 'फ्लाइटमध्‍ये माझ्या ठिक मागे एक मध्‍यम वयाचा माणूस बसला होता. फ्लाईटमधील अंधाराचा फायदा घेत तो सारखे माझ्या मानेला आणि पाठीला पाय घासत होता. मी ताबडतोब याचा विरोध केला. मात्र फ्लाईटमधील गडबडगोंधळाचे त्‍याने कारण दिले. त्‍यामुळे मी शांत बसले. मात्र काही वेळाने त्‍याने पुन्‍हा तसे करणे सुरु केले. मी फ्लाइट क्रूकडेही याची तक्रार केली. मात्र त्‍यांनी कोणतीच मदत केली नाही. शेवटी याचा व्हिडिओ बनवण्‍याचा मी प्रयत्‍न केला. मात्र फ्लाईटमधील अंधारामुळे तेही शक्‍य झाले नाही.'

 

मुंबईला पोहोचल्‍यावर केला लाईव्‍ह व्हिडिओ

अखेर मुंबई विमानतळावर पोहोचल्‍यावर झायरने इन्‍स्‍टाग्रामवर लाईव्‍ह व्हिडिओ केला. त्‍यामध्‍ये झायरा म्‍हणते, 'मी नुकतेच मुंबईला लँड झाले आहे. माझ्यासोबत जे घडले त्‍यामुळे मी पूर्णपणे डिर्स्‍टब झाली आहे. तुम्‍ही मुलींना अशा पद्धतीने वागणूक देणार आहात का? हे भयंकर आहे. यात सगळ्यात वाईट गोष्‍ट म्‍हणजे अशावेळी तुमच्‍या मदतीला कोणीही येत नाही. तुम्‍हालाच तुमची मदत करावी लागते.', हे सांगताना झायराला अश्रू अनावर झाले होते. 

 

दुसरा व्हिडिओ व्‍हायरल

- दरम्‍यान, यासंबंधीचा दुसरा व्हिडिओ आज रविवारी सकाळी 9 वाजेच्‍या सुमारास सोशल मिडीयावर व्‍हायरल झाला अाहे. यामध्‍ये झायराच्‍या सीटमागे बसलेल्‍या व्‍यक्‍तीचे पाय झायराच्‍या सीटपर्यंत पसरलेले दिसत आहे. धक्‍कादायक म्‍हणजे हे पाय झायराच्‍या खांद्याला लागत असलेले स्‍पष्‍टपणे दिसत आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा,

- इन्‍स्‍टाग्रामवर झायराने पोस्‍ट केलेला व्हिडिओ व व्‍हायरल झालेला दुसरा व्हिडिओ तसेच झायराने इन्‍स्‍टा्ग्रामवर केलेल्‍या पोस्‍ट्स... 

 

हेही वाचा,

- महाराष्‍ट्र राज्‍य महिला आयोगाने घेतली दखल, मुंबई पोलिसांना तातडीने लक्ष घालण्‍याचे निर्देश

बातम्या आणखी आहेत...