आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदच्‍या महाराष्‍ट्र आणि गुजरातमधील 9 मालमत्‍तांचा लिलाव, 9 ऑगस्‍टला प्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 1993 मुंबई बॉम्‍ब ब्‍लास्‍टचा मुख्‍य आरोपी अंडरवर्ल्‍ड डॉन दाऊद इब्राहिमच्‍या महाराष्‍ट्र आणि गुजरातमधील 9 संपत्‍तींचा लिलाव करण्‍यात येणार आहे. 9 ऑगस्‍ट रोजी हा लिलाव होईल, अशी माहिती अर्थ मंत्रालयातर्फे देण्‍यात आली आहे. यामध्‍ये मुंबई, औरंगाबाद, वलसाड, सुरत आणि अहमाद येथील मालमत्‍तांचा समावेश आहे. स्मगलिंग एंड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्सअंतर्गत या मालमत्‍तांचा लिलाव करण्‍यात येणार आहे.


मुंबईच्‍या एक प्रॉपर्टीसाठी 79.43 लाख रुपयांची रिझर्व्‍ह प्राइस
या 9 मालमत्‍तांपैकी मुंबईतील एक प्रॉपर्टी मासूला बिल्डिंग (सी.एस. नं 4275) ही दाऊदच्‍या कुटुंबाच्‍या नावावर आहे. 24/26 पाकमोडिया स्ट्रीटवर ही इमारत आहे. याला अमीनो बिल्‍डींगही म्‍हणतात. या प्रॉपर्टीचे आधारमुल्‍य 79,43,000 रुपये ऐवढे ठेवण्‍यात आले आहे. या मालमत्‍तेच्‍या बोलीत सहभागी होण्‍यासाठी 25 हजार रुपये जमा करावे लागणार आहेत. याची अंतिम तारीख 6 ऑगस्‍ट आहे.

 

ख‍रेदीपुर्वी पाहू शकतात मालमत्‍ता
9 ऑगस्‍ट रोजी मुंबईच्‍या वाई बी चव्‍हाण ऑडीटोरियममध्‍ये सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा लिलाव होणार आहे. ज्‍यांना ही मालमत्‍ता खरेदी करायची असेल ते संबंधित अधिका-यांसह 24 जुलैपर्यंत या मालमत्‍तांची पाहणी करू शकतात.


मागील वर्षी सैफी ट्रस्‍टने खरेदी केल्‍या होत्‍या 3 मालमत्‍ता
मागील वर्षी दाऊदच्‍या 3 मालमत्‍ता सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने 11.50 कोटी रुपयांत लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदी केली होती. यामध्‍ये शबनम गेस्ट हाउस, दामरवाला बिल्डिंग आणि हॉटेल रौनक या मालमत्‍तांचा समावेश आहे. यंदाही हे ट्रस्‍ट लिलावामध्‍ये सहभागी होणार आहे. 9 ऑगस्‍टरोजीच्‍या लिलावावरुन शासनाला 2 ते 3 कोटी रुपये मिळण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे.   

 

बातम्या आणखी आहेत...