आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊद इब्राहिमने पुतण्याद्वारे जेलमध्ये इकबाल कासकरसाठी पाठवला मेसेज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरची कारागृहात आणखी एक फरार गुंड अनीस इब्राहिमच्या मुलाने भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. अनीस इब्राहिमचा मुलगा आरिस दुबईमध्ये वास्तव्यास आहे. त्याने इकबाल कासकरचा मुलगा रिजवानसोबत ठाणे कारागृहात इकबाल कासकरची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

या दोघांवर कोणताही खटला नसल्याने त्यांच्यावर नजर ठेवणे अथवा कारवाई करण्याची गरज भासली नाही. मात्र अन्य सूत्रांच्या माहितीनुसार, खुद्द पोलिसांनाच याबाबतची माहिती हे दोघेही दुबईमध्ये परतल्यानंतर मिळाली आहे. दरम्यान, हे दोघं जण नेमक्या कोणत्या तारखेला कारागृहात आले होते, याची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला तीन साथीदारांसह ठाणे खंडणीविरोधी पथकाने 18 सप्टेंबर 2017 रोजी रात्री उशीरा भायखळा येथून अटक केली होती.

 

 

इकबाल कासकरने बिल्डरकडे चार फ्लॅटच्या स्वरुपात खंडणी मागितली होती, अशी माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. या घटनेमध्ये दाऊद इब्राहिमचा सहभाग आहे का याबाबत तपास सुरू आहे, दाऊदचा सहभाग आढळल्यास त्यालाही या प्रकरणात आरोपी केले जाईल ,अशी माहितीदेखील पोलिस आयुक्तांनी दिली होती. 

 

 

अनीस इब्राहिमच्या मुलाने इकबालला दाऊदच्या नाराजी व चिंतेबाबत जाणीव करुन दिली. अनीस इब्राहिमच्या मुलाने इकबालला सांगितले की, इकबालच्या कारागृहातील सुरक्षिततेबाबत दाऊद इब्राहिम काळजीत आहे मात्र दुसरीकडे आपला मुलगा मोइनबाबत पोलिसांना माहिती दिल्याबाबत दाऊद नाराज असल्याचेही त्याने सांगितले.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...