आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कदमांची उचलबांगडी,सावंत नवे पालकमंत्री; खैरेंशी वादामुळे नांदेडला केली रवानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे व शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील अंतर्गत वादामुळे अखेर कदम यांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची नियुक्ती करण्यात अाली.  दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडील  नांदेडचे पालकमंत्रीपद काढून घेण्यात अाले असून ही जबाबदारी कदम यांच्याकडे साेपवण्यात अाली. बुधवारी सरकारने हे बदल केले. 

 

‘मातोश्री’वरून निर्णय
समांतर, भूमिगत गटार अादी याेजनांवरुन खैरे व  कदम यांच्यात वाद हाेते. आगामी लोकसभा निवडणुकीतही खैरे यांचे तिकिट कापण्यासाठी शिवसेनेतीलच काही नेते प्रयत्न करत हाेते. कदमांचे त्यांना पाठबळ असल्याची चर्चा हाेती. या पार्श्वभूमीवर ‘माताेश्री’च्या अादेशाने कदमांची उचलबांगडी झाल्याचे सांगितले जाते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...