आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी, महापालिकेत सादर केला प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. विद्यापीठाचे 'राजमाता जिजाऊ भोसले मुंबई विद्यापीठ असे नामांतरण करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी केली आहे. नरवणकर यांनी तसा प्रस्ताव मुंबई महापालिकेत सादर केला आहे. त्यांनी या प्रस्तावाला सर्व पक्षांची सहमती मिळेल अशा विश्वास व्यक्त केला आहे. 

 

यापूर्वी अनेक विद्यापीठांचे नामांतरण झाले आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणाचा वाद सध्या कोर्टात सुरु आहे. तसेच काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले होते. तर राज्य सरकारने सोलापूर विदयापीठाला आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र हा वाद हायकोर्टात गेला आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या नामांतरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...