आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी भिडेंच्या अटकेसाठी जुलैत विधिमंडळाला घेराव, मुंबईमध्‍ये कार्यकर्त्‍यांची बैठक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांना १ जानेवारी २०१८ च्या कोरेगाव-भीमा  हिंसाचारप्रकरणी अटक करावी, या मागणीसाठी राज्य विधिमंडळाला जुलै महिन्यात घेराव घालण्यात येणार आहे. त्यासंदर्भात कृती आराखडा ठरवण्यासाठी दादरच्या आंबेडकर भवनमध्ये कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली.

 

कोरेगाव भीमा शौर्यदिन प्रेरणा अभियानाच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले हाेते. ४ जुलैपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. त्यादरम्यान विधिमंडळाला घेराव घातला जाणार आहे. घेरावाची पार्श्वभूमी तयार व्हावी यासाठी अभियानाच्या वतीने राज्यभर दौरे काढण्याचे नियोजन आहे, अनेक ठिकाणी सभाही घेतल्या जाणार आहेत. अभियानात राज्यातील २६० पुरोगामी संघटना सहभागी आहेत, अशी माहिती समन्वय समितीच्या सदस्या हर्षाली पोतदार यांनी दिली.


अभियानाच्या वतीने पुण्यात  एल्गार परिषद घेण्यात अाली होती. तत्पूर्वी येवला खैरलांजी येथून अभियानाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यापर्यंत दोन लाँग मार्च काढले होते.

बातम्या आणखी आहेत...