आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा फॉर्मवर स्वाक्षरी घेण्यास गेलेल्या विद्यार्थिनीकडे प्राध्यापकाने केली शरीर सुखाची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- परीक्षा फॉर्मवर स्वाक्षरी घेण्यास गेलेल्या विद्यार्थिनीचा प्राध्यापकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील नामांकित व्हीजेटीआय महाविद्यालयात ही धक्कादायक घटना घडली. प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे स्वाक्षरीच्या बदल्यात चक्क शरीर सुखाची मागणी केली, असे न केल्यास परीक्षेत फेल करण्याची धमकी देखीलही प्राध्यापकाने दिली.

 

या प्रकरणी व्हीजेटीआय प्रशासनाकडे लेखी   तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर दहा दिवसांनी आरोपी प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महाविदयालय प्रशासन आरोपी प्राध्यपकावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप पीडितेने केला. त्यानंतर प्रसार माध्यामांनी या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्राध्यापकावर यापूर्वीही विनयभंगाचा आरोप झाला होता. परंतु, तेव्हाही त्याच्या विरोधात कुठलीही कारवाई झाली नाही. स्वायत्तता मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना किती गुण द्यावे, हे प्राध्यापकांच्या हातात असते. याचाच गैरफायदा घेऊन प्राध्यापकाने हे कृत्य केले, असे आरोप करण्यात आला आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...