आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या 500-1000 च्या नोटांवर प्रक्रिया करून बनवले जात आहे असे काही अनोखे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चेन्नईतील पुजल सेंट्रल जेलमध्ये रिसायकिल केल्या जात आहेत. - Divya Marathi
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चेन्नईतील पुजल सेंट्रल जेलमध्ये रिसायकिल केल्या जात आहेत.

चेन्नई- नोटबंदीनंतर बंदी घातलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चेन्नईतील पुजल सेंट्रल जेलमध्ये रिसायकिल केले जात आहे. यासाठी रिझर्व बॅंक ऑफ इंडिया जेल अॅडमिनिस्ट्रेशनला सुमारे 70 टन नोटा दिल्या आहेत. यातील 9 टन कतरन जेलमध्ये आणल्या गेल्या आहेत. या नोटांवर एक प्रोसेस झाल्यानंतर स्टेशनरीच्या रूपात दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे हे काम जेलमधील शिक्षा भोगत असलेले कैदी करत आहेत. सोबतच त्यांना त्याचा मोबदलाही दिला जात आहे. 

 

अशा प्रकारची स्टेशनरी बनविणारा देशातील पहिला सेंट्रल जेल-

 

- मीडिया रिपोर्ट्सनुसार, 20-25 कैदी रोज जुन्या नोटांवर प्रक्रिया (रिसायकिल) करून स्टेशनरीसारख्या फाईल पॅड बनवत आहेत. 
- पुजल जेलमधील कैद्यांना यासाठी रोजचे 160 ते 200 रुपये रोजची मजूरी दिली जात आहे. हे कैदी 8 तास काम करत आहेत.
- जुन्या नोटांचे अशा प्रकारे स्टेशनरी बनविणारे पुजल जेल हा देशातील पहिला सेंट्रल जेल आहे. 

 

आतापर्यंत 1.5 टन जुन्या नोटांवर प्रक्रिया-

 

- जेल डीआयजी ए मुरुगेसन यांनी न्यूज एजन्सीला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सांगितले की, रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने आम्हाला चलनात बाहेर झालेल्या नोटांचे तुकडे देत असल्याचे सांगितले. 
- जेलला दिल्या जाणा-या 70 टनपैकी आतापर्यंत नऊ टन वजनाच्या नोटा दिल्या गेल्या आहेत. 
- त्यांनी सांगितले की, फाईल पॅड बनविण्यासाठी आतापर्यंत 1.5 टन जुन्या नोटांचा वापर करण्यात आला आहे. 

 

जुन्या नोटा ठेवल्यास लागू शकतो दंड- 

 

- 8 नोव्हेंबर 2016 रोजी भारत सरकारने नोटबंदीचा निर्णय जाहीर करताच 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा चलनातून बाहेर झाल्या.
- नोटबंदीनंतर सरकारने जारी केलेल्या ऑर्डिनन्सनुसार, नोटबंदीनंतर चलनातून बाहेर केल्या गेलेल्या 500 आणि 1000 च्या नोटा जवळ ठेवल्यास, बाळगल्यास दंड लागू शकतो तसेच जेल सुद्धा होऊ शकते.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, चेन्नईमधील जेलमध्ये जुन्या नोटांवर कशी जात आहे प्रक्रिया....

बातम्या आणखी आहेत...