आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेस्मंड नॉर्मन रॉस येट्स विधानसभेवर नियुक्त, अँग्लो इंडियन आमदाराच्या रूपात शपथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधान भवनात मंगळवारी राज्यपाल नियुक्त डेस्मंड नॉर्मन रॉस येट्स यांची विधानसभेवर नामनियुक्ती झाल्याबद्दल शपथविधी झाला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डेस्मंड येट्स यांना शपथ दिली. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट, आमदार राज पुरोहित, विधान मंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे उपस्थित होते.   


नवीन सरकार आल्यानंतर अँग्लो इंडियन आमदाराची नियुक्ती केली जाते. परंतु गेल्या तीन कार्यकाळांपासून विधानसभेत अँग्लो इंडियन सदस्य नव्हता. फडणवीस सरकारनेही साडेतीन वर्षे ही जागा रिकामी ठेवली.  गेल्या काही महिन्यांपासून  डेस्मंड १६ वर्षांनंतर पुन्हा एकदा आमदारकी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. येट्स यांचे प्रयत्न यशस्वी झाले असून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे त्यांची शिफारस केल्याने डेस्मंड येट्स हे पुन्हा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. परंतु, त्यांना फक्त दीड वर्षाचाच कालावधी मिळणार आहे. 

 

१९९५ मध्येही डेस्मंड बनले होते आमदार  
१९९५ मध्ये युती सरकारच्या काळात डेस्मंड अँग्लो इंडियन कोट्यातून आमदार बनले होते. २००२ मध्ये काँग्रेस सरकारविरोधात ९ आमदारांनी बंड केले होते. त्यात डेस्मंड हेसुद्धा होते. त्यांनी शिवसेना-भाजपला समर्थन दिले होते. तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी या ९ जणांना निलंबित केले होते. आतापर्यंत पी.व्ही.गिलेस्पी, आयरिन गिलेस्पी, नॉर्मन फर्ग्युसन, एम.सी.फर्नांडिस, डेनिस लॉरेन्स इमो, ई.जी.वूडमन, सी.एल. प्राऊडफूट, व्हिक्टर फ्रेट्स यांची अँग्लो इंडियन कोट्यातून नियुक्ती झाली होती.

बातम्या आणखी आहेत...