आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या अर्थसंकल्पाची अवस्था मंत्रालयातल्या ‘जाळ्या’सारखीच, धनंजय मुंडे यांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबर्इ - राज्य सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी झाले असल्याचे अार्थिक पाहणी अहवालात स्पष्ट झाले अाहे. राज्य कर्जबाजारी अाहे हे अर्थसंकल्पावरून स्पष्ट झाले असून राज्यपालदेखील सरकारवर नाराज अाहेत. अर्थसंकल्पाची अवस्था मंत्रालयातल्या जाळ्यासारखी झाली अाहे, अशी टीका विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अंदाजपत्रकावर बोलताना केली.


ते म्हणाले, शेतकऱ्यांसाठीचा अर्थसंकल्प असा गवगवा सरकारने केला. मात्र, प्रत्यक्षात त्यात शेतीसाठी केवळ ५ टक्केच तरतूद अाहे. ४३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीदेखील फाेल ठरली अाहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काय मिळाले? शेतकऱ्यांसाठी शंभर याेजना जाहीर केल्या, मग अात्महत्या का थांबत नाहीत? या फसव्या सरकारचा चाैथा फसवा अर्थसंकल्प असून ७० वर्षांत राज्यावर जेवढे कर्ज हाेते तेवढे या तीन वर्षांत या सरकारने कर्ज केले. राज्यातील माणसाच्या डाेक्यावर ६४ हजार काेटी रुपयांचे कर्ज करून ठेवले अाहे. 

 

प्रत्येक विकास कामात कट लावला असून त्याचा निधी खर्च करण्यातही सरकार अपयशी ठरले अाहे. मुंडे यांनी अनेक विभागांचा दाखला देत संबंधित विभागाच्या खर्चाची अाकडेवारी अाणि टक्केवारी सादर केली. १५ हजार काेटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प असला तरी प्रत्यक्षात ही तूट ३५ हजार काेटी रुपयांवर जार्इल. राज्याला कर्जाच्या खार्इत लाेटले असून हे सरकार कर्ज कसे फेडणार, यासाठी उत्पन्नाचे स्राेत कोणते, याचा  उल्लेखही अर्थसंकल्पात नसल्याचे मुंडे यांनी सांगितले.  


सरकारच्या फक्त घोषणाच   
सार्वजनिक अाराेग्यासाठी केवळ ४ टक्के तरतूद करून “चांदा गेले अाणि बांदा अाले’, अशा पोकळ बाता केल्या आहेत.  प्रधानमंत्री कृषी सिंचन याेजनेसाठी सरकार अधिकचा निधी कसा उभा करणार, अल्पसंख्याक विभागाकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले अाहे. स्व. बाळासाहेब ठाकरे अाणि स्व. गाेपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी तरतूद नाही. स्व. मुंडेसाहेबांच्या नावाने सुरू केलेल्या ऊसताेड कामगार महामंडळासाठी तरतूद नाही. त्याचबराेबर अाैरंगाबाद विद्यापीठात मुंडेसाहेबांच्या नावाने सुरू केलेल्या संशाेधन केंद्रासाठी तरतूद न करता स्व. मुंडे यांचा अवमान केला असल्याची टीकाही मुंडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...