आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या सुरेक्षसाठी मुंबईवर ड्रोनने ठेवली जाणार नजर, PANIC बटण दाबताच पोलिस होणार हजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मेट्रो सिटीमध्ये महिलांची सुरक्षा हे पोलिस यंत्रणेपुढे मोठे आव्हानच असते. महिला सुरक्षेवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून अथक परिश्रम घेतले जातात पण आता पोलिसांचा या मेहनतीला अत्याधुनिक तंत्राची जोड मिळणार आहे. मुंबईवर मानवरहित ड्रोनने नजर ठेवली जाणार आहे.‘सेफ सिटी’ प्रकल्पांतर्गत हे सुरक्षा उपाय केले जाणार धोक्याची     सूचना देणारी ‘पॅनिक बटणे’ शहरभर लावली जाणार आहेत. भुयारी मार्ग आणि स्कायवॉक्सवर दीड हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.

 

2012 मध्ये ‘निर्भया’ सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर केंद्रीय गृहखात्याने मोठय़ा शहरांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. संबंधित शहरांमधील पोलीस विभागांकडून त्यासाठी प्रस्ताव मागवले गेले होते. या प्रकल्पाचा 60 टक्के खर्च केंद्र सरकार देणार आहे. मुंबईत त्यासाठी 252 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राज्य सरकारनेही हा प्रकल्प राबवण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त (गुन्हे) संजय सक्सेना यांच्या देखरेखीखाली पुढील तीन वर्षांत या प्रकल्पाची अंमलबजावणी होईल अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त के. एम. एम. प्रसन्ना


वाहनांना क्यूआर कोड्स, महिलांसाठी पॅनिक बटण
महिला बसेस, टॅक्सी आणि रिक्षामधून जास्त प्रवास करतात. त्यामुळे या वाहनांना क्यूआर कोडस् आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन (आरएफआयडी) टॅग्ज पुरवण्याचीही योजना आहे. जेणेकरून गुन्हा घडल्यास अशी वाहने शोधणे सोपे होईल. महिलांसंदर्भात गुन्हे सतत घडत असतात असे प्रत्येक ठिकाण जाणून घेऊन तिथे ‘पॅनिक बटण’ लावले जाईल. हे बटण दाबताच संबंधित पोलीस ठाण्याला तातडीने सिग्नल जाईल आणि पोलीस घटनास्थळी पोहचतील.

 

बातम्या आणखी आहेत...