आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Lift कोसळल्‍याने मुंबईत वृद्धाचा मृत्‍यू, 24 तासांत दुसरी दुर्घटना Due To The Collapse Of Lift, The Death Of The Elderly In Mumbai

Lift कोसळून मुंबईत वृद्धाचा मृत्‍यू, 24 तासांत दुसरी दुर्घटना; गुन्‍हा दाखल होणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्‍सेटमध्‍ये एव्‍हरेस्‍ट अपार्टमेंट. - Divya Marathi
इन्‍सेटमध्‍ये एव्‍हरेस्‍ट अपार्टमेंट.

मुंबई- वांद्रे पश्चिममधील एका इमारतीची लिफ्ट कोसळून 60 वर्षीय वृद्धाचा मृत्‍यू झाला आहे. राधेशाम हरिजन असे त्‍यांच नाव आहे. आज (मंगळवारी) सकाळी 9 वाजता होली फॅमिली हॉस्पिटलजवळील एव्‍हरेस्‍ट अपार्टमेंटमध्‍ये ही घटना घडली. दुर्घटनेनंतर राधेशाम यांना तातडीने भाभा रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. मात्र त्‍याआधीच त्‍यांचा मृत्‍यू झाला होता.


निष्‍काळजीपणाबद्दल गुन्‍हा दाखल होणार

सोसायटीने लिफ्टच्‍या देखभालीमध्‍ये निष्‍काळजीपणा केला होता का? याअनुषंगाने तपास करण्‍यात येणार असल्‍याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्‍यानूसार संबंधितांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

एका दिवसाच्‍या आत दुसरी घटना

मुंबईतील रमाबाई नगरमधील शांती-सागर पोलिस हाऊंसिग सोसायटीमध्‍ये काल सोमवारीच एक लिफ्ट कोसळल्‍याने 4 जण जखमी झाले होते. लिफ्ट खाली येत असताना इमारतीच्‍या चौथ्‍या मजल्‍यावर लिफ्टची वायर तुटली होती. त्‍यामुळे लिफट थेट जमिनीवर कोसळली होती. या घटनेत रूपाली गायकर (23), सुनीता इंगोले (28), कोमल दळवी (43) आणि विनायक दळवी (43) हे जखमी झाले होते.    

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या दुर्घटनेचे फोटो...


 

 

बातम्या आणखी आहेत...