आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- पोलिस म्हटला की चोवीस तास तत्पर असे म्हणण्याचे दिवस आता किमान मुंबई पोलिसांसाठी तरी इतिहासजमा होणार आहेत. कारण मुंबई पोलिसांच्या अधिकृत कामाचे तास आता फक्त आठ तासांवर आणण्याचा निर्णय मुंबई पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी घेतला आहे. सुरुवातीला काही निवडक पोलिस ठाण्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेली ही संकल्पना आता सर्व ९३ पोलिस ठाण्यांमध्ये लागू करण्यात आली आहे.
मुंबई पोलिस आयुक्तपदाचा पदभार सांभाळताच दत्ता पडसलगीकर यांनी पोलिसांच्या कामांचे तास कमी करण्याबाबतची एक योजना तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार देवनार पोलिस ठाण्याचे शिपाई रवींद्र पाटील यांनी एक योजना पोलिस आयुक्तांना सादर केली होती. या योजनेचा अभ्यास करण्यासाठी देवनार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक यशवंत पालवे, पोलिस हवालदार राजकुमार कारंडे, पोलिस नाईक स्नेहा सावंत, पोलिस शिपाई रवींद्र पाटील आणि ज्योत्स्ना दांगट यांची समिती नेमली होती. या समितीने मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांना भेटी देऊन या योजनेच्या उपयोगितेबाबतचा अहवाल पोलिस आयुक्तांना सादर केला होता. या अहवालाच्या आधारे पोलिसांसाठी आठ तास कर्तव्य ही योजना देवनार पोलिस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार ५ मे २०१६ रोजी देवनार ठाण्यात टप्प्याटप्प्याने ही योजना राबवण्यात अाली. पहिल्या टप्प्यात ठाणे अंमलदार, प्रथम शोध पथक व रुटीन रायटर यांच्या कामांचे तास आठ तासांवर अाणले. हा टप्पा कमालीचा यशस्वी ठरल्याने अंमलदारांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून अाले.
तीन पाळ्यांत काम
आठ तास ड्यूटीमुळे पोलिस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहतील, अशी अाशा अाहे. प्रत्येक ठाण्यातील कर्मचारी संख्या लक्षात घेऊन त्यांचे चार गटात विभाजन करण्यात आले. त्यानुसार पहिली पाळी सकाळी ७ ते दुपारी ३, दुसरी ३ ते रात्री ११ आणि रात्रपाळी ११ ते सकाळी ७ अशी करण्यात आली आहे. कार्यालयीन काम पाहणाऱ्या पोलिसांना सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत काम असेल.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.