आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगेश पाडगावकरांना आवडायचे पत्नीचे डोळे, वाचा प्रेम करायला शिकवणा-या कवीची लव्हस्‍टोरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ कवी, साहित्यिक मंगेश पाडगावकर यांचा आज दुसरा स्मृतीदिन आहे. दोन वर्षापूर्वी पाडगावकरांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले होते. मराठी साहित्‍यात भक्‍कम योगदान देणारे पाडगावकरांचे आयुष्‍यही काही खडतर, काही गंमतीदार राहिलेले आहे. कवी पाडगावकर यांच्‍या पत्‍नी यशोदा पाडगावकर यांनी '‘कुणास्तव कुणीतरी' ही आत्मकथा लिहिली. आपण कसे जगत आलो, याविषयी त्‍यांनी मोकळेपणाने लिहिले आहे. यशोदाबाई आणि पाडगावकर यांचे कॉलेज जीवनात जुळलेले प्रेम, तत्‍कालिन गमतीदार आठवणी यशोदाबाई यांनी या आत्‍मकथेत मांडल्‍या. या संग्रहात जाणून घेऊ त्‍यापैकीच काही आठवणी.....

 

यशोदाबाईंचे वडील ख्रिश्चन-

 

- सासवडमध्‍ये यशोदाबाईंचे वडील भास्‍करराव उजगरे हे ख्रिश्चन धर्माचे मिशनरी होते. आधी ते गिरगावात महारबावडी येथे राहत होते. 
- तेथे त्‍यांनी अंब्रोली चर्चमध्‍ये धर्मगुरूंचे काम स्‍वीकारले होते. पुढे नोकरीसाठी ते पुण्‍यात सासवडला गेले. त्‍यावेळी यशोदाबाई या लहान होत्‍या. 
- तेथील बालपणापासूनचे विविध प्रसंग त्‍यांनी या आत्‍मकथेत मांडले आहेत. कुटुंब सुखात असताना अचानक यशोदाबाई यांच्‍या वडिलाचं अकस्‍मात निधन झाले व त्‍यांच्‍या खडतर आयुष्‍याला सुरूवात झाली. 
- आई सोनूबाई यांनी कुटुंबप्रमुखाची जबाबदारी कशीतरी सांभाळली. त्‍यासाठी आईलाही नोकरी करावी लागली. यावेळी कुटुंबात आलेले अनेक चढउतार यशोदाबाईंनी आत्‍मचरित्रात मांडले आहेत.

 

मुंबईच्‍या कॉलेजात पाडगावकर मित्र-

 

- यशोदाबाईंचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्‍या मुंबईमध्‍ये काकाकडे राहायला गेल्‍या. 
- सिंधू ही यशोदाबाई यांची चुलत बहीण. सिंधूसोबतच त्‍या विल्‍सन कॉलेजात जात होत्‍या. यावेळी सिंधूच्‍या मैत्रीसोबत त्‍यांची ओळख झाली. 
- त्‍यामध्‍ये विठ्ठल प्रभू, मंगेश पाडगावकर, यांचाही समावेश होता. प्रभू आणि पाडगावकर दोघेही कॉलेजच्‍या हॉस्‍टेलात राहायचे.

 

सिगरेट ओढत फिरायचे पाडगावकर-

 

- विल्‍सन कॉलेजमधील मंगेश पाडगावकर यांच्‍या आठवणीही यशोदाबाईंनी लिहिल्‍या आहेत. त्‍या म्‍हणतात की, 'आमच्‍या क्‍लासरूमच्‍या मागच्‍या बाजूला हॉस्‍टेलची गॅलरी दिसायची.
- कधी तरी स्‍वत:त मग्‍न असलेला मंगेश तिथे सिगरेट ओढत स्‍वस्‍थपणे फिरताना वर्गातून दिसायचा. - दंग गोरापान, मोठे व किंचित बाहेर आलेले डोळे, अशक्‍त व नाजूक शरीर, दाढी वाढवलेली, मानेपर्यंत लांब उलटे फिरवलेले काळेभोर केस. 
- हनुवटीबरोबर कापलेली बलगॅनिन टाइप दाढी, पांढरा झब्‍बा. हा अवतार पाहून माझ्या मनात त्‍यांच्‍याबद्दल कुतूहल निर्माण झालं. 
- नंतर कळलं की, तो कवी आहे. सिंधू त्‍याला 'एक कवी' म्‍हणून हाक मारत होती. एकूण पात्र विनोदीच दिसायचे'

 

पुढील स्‍लाईड्सवर क्‍लिक करून वाचा....

 

मंगेश पाडगावकरांना यशोदाबाईंचे डोळे आवडत..
प्रेम प्रकरणाला यशोदाबाईंच्‍या आईचा विरोध..
यशोदाबाई ख्रिश्चन, तर पाडगावकर सारस्‍वत ब्राह्मण..
नोंदणी पद्धतीने विवाह..
तेव्‍हा पाडगावकरांकडे 10 रूपयेही नव्‍हते.

बातम्या आणखी आहेत...