आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेतील मृतांच्या कपाळावर नंबर टाकणे चुकीचे; हायकोर्टाचे सरकारवर ताशेरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. एल्फिन्स्टन स्टेशनवरील ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कपाळावर नंबर टाकणे चुकीचे असल्याचे मत हायकोर्टाने व्यक्त केले आहे. मृतदेहांचाही सन्मान करायला हवा, अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले आहे.

 

 

डॉक्टरांनी शवविच्छेदन करताना कपाळावर स्केचपेनने नंबर टाकल्याची माहिती यावेळी राज्य सरकारने दिली. जाब विचारणाऱ्या नातेवाईकांवर पोलिसांकडून केसेस दाखल होणे धक्कादायक असल्याचेही मुंबई हायकोर्टाने सांगितले. भविष्यात अश्याप्रकारची घटना घडल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत का? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी यंत्रणा अजून सक्षम करण्याची गरजही कोर्टाने व्यक्त केली. आरटीआय कार्यकर्ता प्रदीप भालेकर यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. केंद्र सरकार, रेल्वेसह इतर प्रतिवादींना उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...