आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक तंगी : कुटुंबासह कर्मचाऱ्याची आत्महत्या, वांद्र्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिकट आर्थिक स्थितीला कंटाळून मुंबईतील वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या राजेश भिंगारे (४५) यांनी पत्नी व दोन मुलांसह घरात आत्महत्या केली. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. भिंगारे हे मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते.


शनिवारी सकाळपासूनच भिंगारे यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांना संशय आल्यावर दरवाजा तोडण्यात आला तेव्हा सर्व कुटुंब मृतावस्थेत आढळले.  भिंगारे यांच्या घरात पोलिसांना एक चिट्ठी सापडली असून गेल्या काही काळापासून सततच्या आर्थिक अडचणींना कंटाळून नैराश्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे.


राजेश भिंगारे यांची पत्नी अश्विनी या गृहिणी होत्या. मोठा मुलगा तुषार हा हॉटेल मॅनेजमेंटच्या अखेरच्या वर्षात शिकत होता. तर लहान मुलगा गौरांग हा रुपारेल महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. रात्री जेवणातून विषारी द्रव्य घेत ही आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

 

बातम्या आणखी आहेत...