आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने गारपीटग्रस्त शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली, एकरी 5 हजारांची मदत जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात अवकाळी व गारपीटीने मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपीटग्रस्तांना सरकारने आज तातडीने मदत जाहीर केली. कोरडवाहू शेतक-यांसाठी प्रति हेक्टरी (अडीच एकर) अवघे सहा हजार रूपये तर जिरायतीसाठी प्रति हेक्टरी 13,500 रूपयांची तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे. पीकविमा आणि एनडीआरएफच्या नियमानुसार ही शासकीय मदत दिली जाणार आहे. दरम्यान, सरकारच्या या तोकड्या मदतीमुळे यावेळी सरकारने नुकसानग्रस्त शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्याची भावना झाली आहे.

 

फळबाग शेतक-यांना तुलनेने चांगली मदत-

 

- मोसंबी आणि संत्र्या उत्पादक शेतक-यांना प्रति हेक्टरी 23 हजार 300 रूपये मिळणार
-  केळी उत्पादक शेतक-यांना प्रति हेक्टरी 40 हजार रूपये
- तर आंबा उत्पादक शेतक-यांना प्रति हेक्टरी 36 हजार 700 रुपये भरपाई मिळणार आहे.  
- विमा नसलेल्या फळबाग शेतक-यांनाही प्रति हेक्टरी 18  हजार रूपयांची मदत मिळणार आहे.

10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान राज्यात झालेल्या गारपीटीत मराठवाडा व विदर्भात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. 

बातम्या आणखी आहेत...