आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण, 69.10 रुपये प्रति डॉलर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीत गुरुवारी ऐतिहासिक घसरण झाली. सकाळी बाजारात व्यवहार सुरू होताच प्रति डॉलर रुपयाची किंमत 69.10 पर्यंत घसरली. दिवसभरात एकूण 49 पैशांची घसरण झाली. सकाळी प्रति डॉलर 68.87 रुपयांपर्यंत घसरलेला रुपया 68.61 रुपयांवर बंद झाला.

 

कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये वाढलेला दर आणि चालू वित्तीय तूट वाढण्याच्या धास्तीने तसेच संभाव्य चलनफुगवट्याच्या चिंतेमुळे सुरुवातीच्या व्यवहारात रुपया डॉलरमागे एकदम 49 पैशांनी घसरला व 69.10 रुपयांवर आला. ही ऐतिहासिक घसरण ठरली. तेल कंपन्या तसेच बँकांकडून अमेरिकी चलनाची वाढत चाललेल्या मागणीमुळे कच्च्या इंधन तेलाचे दर चढे राहिले. त्यामुळे भारतीय चलनावर दबाव आला. 

 

कारण काय?
अमेरिकेने बुधवारी भारत, चीनसह सर्व सहकारी देशांना इराणकडून कच्च्या तेलाची आयात 4 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्याचे आवाहन केले होते. यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर एकदम वाढले. 


पुढील स्‍लाइडवर वाचा, भारतीय अर्थव्यवस्थेला धोका नाही- मुडिज...

 

 


 

 

बातम्या आणखी आहेत...