आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कनेक्शन न ताेडण्याची घाेषणा केली अाहे. तरीसुद्धा संपूर्ण वीज बिलमाफी अाणि सरसकट कर्जमाफीवर शेतकऱ्यांची सुकाणू समिती ठाम अाहे. या मागण्यांसाठी सुकाणू समितीने काढलेली जागर यात्रा गुरुवारी मुंबईत पाेहोचली. अापल्या मागण्यांसाठी जागर यात्रेच्या समाराेपाला राज्यव्यापी जेलभराे करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी समन्वय समितीचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी गुरुवारी मुंबईत दिली.
या वेळी भाकपचे प्रकाश रेड्डी, सत्यशाेधक कम्युनिस्ट पक्षाचे किशाेर ढमाले, बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश जगताप, सुकाणू समितीच्या सदस्य सुशीला माेराळे अाणि अन्य शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित हाेते. कर्जमाफी झाल्यानंतर पुन्हा कर्ज हाेऊ नये यासाठी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, अशा पद्धतीचे भाव शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. परंतु सध्या कांदा, साखर, गहू, तांदूळ या सर्वांवरच निर्यातबंदीमुळे शेतकरी त्रस्त झाला अाहे. दीड लाखावरील कर्जालाही माफी मिळाली पाहिजे. कर्ज अाणि विजेचे बिल हे सरकारच्या धाेरणामुळेच थकले अाहे. त्यामुळे कर्जमाफी मिळाली पाहिजे, असे पाटील यांनी या वेळी सांगितले.
४० संघटनांची यात्रा, सांगलीतून सुरुवात
‘करकर्जा नही देंगे, बिजली का बिल भी नही देंगे’ या असहकार अांदाेलनाचा एक भाग म्हणून राज्यभरातल्या ४० शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने २३ मार्चपासून राज्यव्यापी ‘हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर’ यात्रा अायाेजित केली अाहे. सांगली जिल्ह्यातून यात्रेला सुरुवात झाल्यानंतर निपाणी, काेल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असा प्रवास करत ही यात्रा गुरुवारी सकाळी मुंबईत दाखल झाली. अातापर्यंत ७ जिल्ह्यांचा दाैरा पूर्ण झाला असून ३० जिल्ह्यांचा दाैरा बाकी अाहे. २७ एप्रिल राेजी पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यात या यात्रेचा समाराेप होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.