आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मल्ल अावारेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत  ५७ किलाे वजनी गटात फ्री स्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावणारा पाटाेदा (जि. बीड) येथील मल्ल राहुल अावारेचा गुुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. ‘राहुल आवारे ऑलिम्पिकचे मैदानही जिंका. त्यासाठी प्रशिक्षणासह आवश्यक त्या सर्व सुविधांसाठी शासन खंबीर पाठबळ देईल, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे,’ अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.    या वेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित हाेत्या. 


मुंडे  प्रतिष्ठानकडून १.५१ लाख
राहुल आवारे याच्या पुढील प्रशिक्षणासाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गोपीनाथ मंुडे प्रतिष्ठानच्या वतीने राहुलला १ लाख ५१ हजार रुपयांची मदत करण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यात अकादमी स्थापन केल्यास सर्वतोपरी मदतीची तयारीही पंकजा मंुडे यांनी दाखवली.

बातम्या आणखी आहेत...