आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर सरकारला जाग: \'त्या\' शेतक-यासह दौंडाई प्रकल्पात जमिनी गेलेल्यांना मोबदला मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळ्यातील 80 वर्षीय धर्मा पाटील या शेतक-याने सरकारकडून मदत मिळत नसल्याने मंत्रालयात जाऊन विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर सरकारने डोळे उघडले आहेत. - Divya Marathi
धुळ्यातील 80 वर्षीय धर्मा पाटील या शेतक-याने सरकारकडून मदत मिळत नसल्याने मंत्रालयात जाऊन विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर सरकारने डोळे उघडले आहेत.

मुंबई- धुळे जिल्हयातील दोंडाईचा सोलर पार्क या प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीपैकी 199 हेक्टर जमिनीसाठी सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज संबंधीत शासकीय यंत्रणेला दिले. 

 

धुळ्यातील 80 वर्षीय धर्मा पाटील या शेतक-याने सरकारकडून मदत मिळत नसल्याने मंत्रालयात जाऊन विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर सरकारने डोळे उघडले आहेत. सोमवारी ऊर्जामंत्र्यांची भरपाईसंदर्भात बैठक होती. त्यासाठी धर्मा मुलासह मंत्रालयात आले. पण ती रद्द झाली. त्यानंतर मुलगा निवेदन देण्यास मुख्यमंत्री कार्यालयात गेला व 4.30 दरम्यान हा आत्महत्येचा प्रयत्न झाला. मंगळवारी धर्मा यांना 15 लाख सानुग्रह अनुदान देऊ, असे ऊर्जामंत्री बावनकुळेंनी म्हटले होते. मात्र, स्वाभिमानी पाटील कुटुंबियांनी सानुग्रह नाकारले असून, आम्हाला फक्त आमच्या जमिनीचा मोबादला द्यावा अशी मागणी केली आहे. त्याची दखल घेत सरकारने सरसकट शेतक-यांना सानुग्रह देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

सन 2009 मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला होता. तेव्हापासून या प्रकल्पाबाबत काहीच निर्णण घेतला गेला नाही. विद्यमान महाराष्ट्र शासनाने  याबाबत निर्णय घेऊन प्रकल्पाला गती दिली. या प्रकल्पासाठी 824 हेक्टर जमीन घेण्याचे निश्चित करण्यात आले. मेथी आणि विकरण गावातील शेतकऱ्यांची 675 हेक्टर खाजगी जमिनीही या प्रकल्पासाठी निश्चित झाली. 149 हेक्टर शासकीय जमिनही या प्रकल्पासाठी घेण्यात आली.

 

खाजगी आणि शासकीय मिळून या प्रकल्पासाठी 529 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यापैकी 476 हेक्टर खाजगी व 45 हेक्टर शासकीय जमिनीचा समावेश आहे. सन 2012 मध्ये 476 हेक्टर जमिनीचा मोबदला नियमानुसार 47.60 कोटी देण्यात आला. उर्वरीत 199 हेक्टर  जमीन गेलेल्या 138 शेतकऱ्यांना वाढीव मोबदला हवा होता. या शेतकऱ्यांनी नियमानुसार महसूल विभागाच्या भूसंपादनाच्या कलम 18 नुसार आपली मागणी न्यायालयाकडे नोंदवायची होती. पण कुणीच कलम 18 नुसार वाढीव मोबदल्याची मागणी केली नाही.

 

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आज झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत 199 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्ताव तयार करावयाच्या सूचना महानिर्मितीला दिल्या. त्यानुसारच येत्या आठ दिवसात या शेतकऱ्यांनाही सानुग्रह अनुदान देण्याचा सकारात्मक निर्णय शासन घेत आहे. कोरडवाहू जमिनीसाठी जो मोबदला दिला जाईल. त्यापेक्षा दीडपट मोबदला हंगामी बागाईतदारांसाठी तर दुप्पट मोबदला बागाईतदार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. तसेच पहिल्या खरेदीच्या दिनांकापासून आतापर्यंत या रक्कमेवर व्याजही देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला प्रधान सचिव, अरविंद सिंग, महानिर्मिती व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी व संबंधीत वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...