आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाहीच: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात १ नाेव्हेंबर २००५ राेजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिभाषितअंशदान निवृत्ती वेतन याेजना  सक्तीची अाहे. या याेजनेतून काेणत्याही संवर्गास वगळून जूनी निवृत्तीवेतन याेजना लागू करता  येणार नाही, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाेत्तराच्या लेखी  उत्तरात दिली. २००५ नंतर शासन सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ व ८४ ची मूळ पेन्शन याेजना लागू करण्यात येणार का असा लेखी प्रश्न कपिल पाटील, प्रा. अनिल साेले, नागाेराव गाणार, गिरीशचंद्र व्यास यांनी विचारला हाेता. त्यावर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...