आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थमंत्री मुनगंटीवार यांची पत्नी सपना यांची तिरूपती बालाजी देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुधीर मुनगंटीवार पत्नी सपना यांच्यासह - Divya Marathi
सुधीर मुनगंटीवार पत्नी सपना यांच्यासह

नागपूर- राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पत्नी सपना मुनगंटीवार यांची तिरुपती तिरूमला (बालाजी) बोर्डाच्या विश्वस्त पदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातून एखाद्या व्यक्तीची तिरुपती बोर्डाच्या विश्वस्तपदी जाण्याची ही पहिलीच वेळ असून, तो मान सपना यांना मिळाला आहे.

 

तिरूपती बालाची बोर्डाच्या कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने राखीव असतो. त्यामुळे सपना यांना विश्वस्त बनविण्याचा निर्णय मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तूळातही याची खमंग चर्चा आहे. मात्र, मंत्री मुनगंटीवर स्वत: व त्यांचे कुटुंबिय हे तिरूपती बालाजींचे निस्सीम भक्त राहिले आहेत. राज्यात मंत्री होताच व त्यानंतर अर्थमंत्रीपद मिळताच सुधीर मुनगंटीवार खास चार्टर्ड प्लेनने बालाजीच्या दर्शनाला गेले होते. खासगी उद्योगपतीच्या प्लेनने गेल्याने त्यावेळी वादही झडला होता.

 

सुधीरभाऊ यांच्या पत्नी सपना या तिरुपती बालाजींच्या निस्सीम भक्त आहेत. त्या नियमितपणे दर्शनासाठी तिरूपती जातात. अशावेळी सपना यांची विश्वस्त म्हणून झालेली निवड म्हणजे देवाने दिलेला प्रसाद असल्याचे मुनगंटीवार कुटुंबियांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...