आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष‍िभूषण दादाजी खोब्रागडे यांना उपचारासाठी मुख्यमंत्र्यांकडून दोन लाखांची मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृषीतज्ज्ञ दादाजी खोब्रागडे हे सध्या पक्षाघाताने आजारी असून त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. - Divya Marathi
कृषीतज्ज्ञ दादाजी खोब्रागडे हे सध्या पक्षाघाताने आजारी असून त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई- तांदळाचे विविध वाण शोधणारे कृष‍िभूषण दादाजी खोब्रागडे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन लाख रुपयांचे सहाय्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केले आहे.

 

नागभीड तालुक्यातील नांदेड (ज‍ि. चंद्रपूर) येथील दादाजी रामाजी खोब्रागडे हे सध्या पक्षाघाताने आजारी असून त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निध‍ीतून दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूर केली आहे. मुंबई येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेतून हे अर्थसहाय्य स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चंद्रपूर शाखेत वर्ग करण्यात आले आहे. खोब्रागडे हे उपचार घेतील, त्या रुग्णालयाच्या खात्यामध्ये आवश्यकतेनुसार ही रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाकडून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

खोब्रागडे यांनी धानावर प्रयोग करीत व‍िव‍िध वाण व‍िकस‍ित केले आहेत. हे वाण प्रसिद्ध असून या कार्याबद्दल त्यांना न‍िरन‍िराळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान‍ित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...