आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई सत्र न्यायालयाच्या इमारतीला अाग; नवीन वर्षात अागीच्या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कमला मिल जाळीत प्रकरणानंतर मुंबईत सुरू झालेली आगीची मालिका अद्याप थांबलेली नाही. मुंबईत दररोज आधीच्या घटना घडत असून सोमवारी कर्मवीर भाऊराव मार्गावरील सत्र न्यायालयालयाच्या  तिसऱ्या मजल्याला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आग लागली. 

 

सकाळच्या वेळात सत्र न्यायालयाची इमारत बंद असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
अग्निशमन दलाला सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी सत्र न्यायालयाच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित ताबा मिळवत ही आग विझवली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीमध्ये न्यायालयाच्या कामकाजाशी संबंधित कागदपत्रे जळाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मुंबई शहरात ठिकठिकाणी आगी लागण्याचे प्रकार घडत अाहेत. पहिला आठवडा संपतांना कांजुरमार्ग येथील सिनेव्हीस्टा स्टुडिअाेला लागलेल्या अागीत अाॅडिओ तंत्रज्ञाचा मृत्यू झाला. नवीन वर्षात अागीच्या  दुर्घटनेमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झालेला आहे.

 

मुंबईत आगीचे सत्र
शनिवारी रात्री कांजुरमार्गच्या ‘सिनेव्हिस्टा’ स्टुडिअाेत लागलेल्या अागीत अाॅडिअाे तंत्रज्ञ सुरेश वर्मा (२०) या तरुणाचा मृत्यू झाला होता. सिनेव्हिस्टाची अाग अाटाेक्यात येत नाही ताेच रविवारी सकाळी लाेअर परळच्या एका निवासी इमारतीला अाग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात काेणतीही मनुष्यहानी झाली नाही. कमला मिलमधील पबच्या जळीत कांडापासून अातापर्यंत मुंबईत ४ ठिकाणी आग लागली आहे.

 

हेही वाचा,
मुंबई: कांजुरमार्ग येथील ‘सिनेव्हिस्टा’ स्टुडिअाेतील अागीत युवा तंत्रज्ञाचा मृत्यू

बातम्या आणखी आहेत...