आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई: काळाचौकी परिसरात गोदामाला भीषण आग, आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील काळाचौकी परिसरातील एका गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली. तेथील दत्ताराम लाड मार्गावर हे गोदाम आहे. आग नेमकी कशाने लागली याची माहिती मिळाली नाही. घटनास्थळी आठ फायर इंजिन्स आणि पाच पाण्याचे बंब दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे.

 

या परिसरात रहिवासी इमारती आहे. गोदामाला लागलेल्या आगीचा धूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडला आहे. त्यामुळे ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे.  

बातम्या आणखी आहेत...