आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CSTM स्टेशनवर एक्सप्रेस ट्रेनच्या बोगीमध्ये लागली भीषण आग, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. CSMT स्टेशनवर आज दुपारी सव्वा तीन वाजता रेल्वे यार्डात उभी असलेल्या सोलापूर एक्सप्रेच्या बोगीत अचानक आग लागली. ही आग विझवण्याकरता अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार प्लॅटफार्म सोलापूर एक्सप्रेस रेल्वे यार्डात उभी होती त्यावेळी अचानक बोगीत आग लागली. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

सविस्तर वृत्त लवकरच....

 

बातम्या आणखी आहेत...