आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिनविशेष: मुंबईत आढळला पहिला एड्स रुग्ण; जाणुन घ्या, रोग पसरण्याची 4 कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतात एड्स बाधित व्यक्ती प्रथम चेन्नईमध्ये आढळली. मुंबईत पहिला एड्स रुग्ण 22 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे ९ जून १९८६ मध्ये सापडला. त्यानंतर अधिक रुग्ण सापडत गेले. या रोगाचा संसर्ग आता केवळ वेश्या, समलिंगी, ट्रक ड्रायव्हर्स यांच्यापुरता मर्यादित न राहता त्यांच्या घरांमध्ये आणि तिथून पुढे नवजात बालकांमध्ये पसरत आहे. 


महाराष्ट्र राज्यामध्ये एड्सचा प्रादुर्भाव अनेक कारणांमुळे जास्त आहे. मुंबई वगैरे शहरे धरुन राज्यात 42% लोक शहरी भागात राहतात. उद्योग धंद्यांमुळे बाहेरुन येणा-या कामगारांचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. वेश्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे लिंगसांसर्गिक आजार आणि एचायव्ही -एड्स यांचे प्रमाण जास्त आहे. राज्यात सुमारे सव्वा दोन लाख एच.आय.व्ही बाधित व्यक्ती नोंदलेल्या आहेत. परंतु एकूण सांसर्गिक व बाधित रुग्ण मिळून सुमारे साडे आठ लाखांचा अंदाज आहे. राज्यात एड्स रुग्णांची एकत्रित संख्याच सुमारे 48000 असून त्यातील सुमारे 3000 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र महाराष्ट्रात आता थोडी सुधारणा झालेली आहे.


सध्या राज्यातले गरोदर मातांमधील एच.आय.व्ही संसर्गाचे प्रमाण सव्वा टक्क्यावरून 0.9 टक्यापर्यंत खाली आले आहे. लिंग सांसर्गिक आजारांच्या बाह्य रुग्ण विभागात येणा-यांपैकी सुमारे 18% एच.आय.व्ही बाधित असायचे (1998) तर आता त्यांचे प्रमाण 10% पर्यंत खाली आलेले आहे. स्वत:हून रक्त देणा-यांमध्ये एच.आय.व्हीचे प्रमाण पूर्वी 1.35 होते ते आता 0.66 झालेले आहे. यासाठी राज्याने निरनिराळया मोहिमा आखून या रोगाला आळा घालण्यासाठी विविध प्रयत्न केलेले आहेत. तिस-या टप्प्यात आता खालील उद्दिष्टे आहेत.


ब्लड डोनेशन पासुन शेविंग सारखी सामान्य गोष्टी देखील या भयंकर रोगाचे कारण बनु शकते. सर्वात गंभीर समस्या म्हणजे अजूनही हा मुळापासून नष्ट करण्याची औषधी निर्माण झाली नाही. याचा व्हायरस थांबवण्याचे औषध सध्या उपलब्ध आहे. परंतु हे खुप महागडे असल्यामुळे सामान्य लोकांपासून दूर आहेत. यामुळे आपण काळजी घेऊनच हा रोग स्वतः पासुन दूर ठेवू शकते.


एचआईव्ही आजार
ही एक अशी स्टेज आहे ज्यामध्ये व्यक्तिची इम्यूनिटी ह्यूमन इम्यूनोवाइरस(एचआयव्ही) च्या अटॅक नंतर नाजूक होऊ लागते आणि जर याचे इलाज केले नाही तर हे अनेक प्रकारचे इन्फेक्शन पसरवते. याच्या सर्वात लास्ट स्टेजला एड्स नाव दिले गेले आहे. एचआईव्ही शरीरात पसरण्याच्या आणि एड्समध्ये बदलण्यासाठी जवळजवळ दहा वर्षांचा कालावधी लागतो. परंतु हे पुर्णपणे रोग्याच्या इम्यूनिटी पाव्हरवर अवलंबून असते.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा एटआयव्ही आजार पसरण्याची 4 कारणे आणि यांच्या संकेतांविषयी...

 

बातम्या आणखी आहेत...