आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिले पॉड हॉटेल मुंबईत, कमी खर्चात उत्तम सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईत देशातील पहिले पॉड हॉटेल सुरू करण्यात आले असून या थ्री स्टार हॉटेलमुळे हॉटेल व्यवसायात एक नवीन प्रवाह सुरू झाला आहे. बजेटमध्ये लक्झरी सुविधा देणारे आणि महिलांसाठी वेगळा कक्ष देणारे हे देशातील पहिलेच हॉटेल आहे. 


तरुण-तरुणी फिरण्यासाठी वा एक-दोन दिवसांच्या कामासाठी प्रवास करतात. जपान व सिंगापूरमध्ये अशा यात्रेकरूंसाठी पॉड हॉटेल सुरू करण्यात आले आहे. शलभ मित्तल व अहमदाबादेतील हॉटेल व्यावसायिक हिरेन गांधी या तरुणांनी अर्बनपॉड कंपनी स्थापन करून पॉड हॉटेलची सुरुवात केली आहे. दोघांनाही याची कल्पना सिंगापूर येथील पॉड हॉटेल पाहून आली. शलभ मित्तल यांनी सांगितले, कामानिमित्त सिंगापूरला असताना मला पॉड हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळाली. आधुनिक तरुणांसाठी असलेली पॉड संकल्पना मला खूप आवडली. भारतात आल्यावर मी मित्र हिरेन गांधीला याविषयी सांगितले. नंतर आम्ही दोघांनी पुन्हा सिंगापूरला जाऊन पॉड हॉटेल पाहिले. त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहून भारतातही असे हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत येणाऱ्यांना हॉटेलची खूप चणचण असते त्यामुळे आम्ही विमानतळ आणि बहुतेक मोठ्या कंपन्या, स्टुडिअाे अंधेरीत असल्याने अंधेरी येथेच पहिले पॉड हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. 


कसे आहे पॉड हॉटेल 
७ बाय ४ च्या आकाराची एक ट्यूब असून यात पूर्ण आकाराचा बेड, मूडप्रमाणे लाइटिंगची सोय, वाय-फाय, सॅटेलाइट टीव्ही, २ यूएसबी पोर्ट आणि मौल्यवान सामान ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक लॉक, स्मोक डिटेक्टर, अग्निरोधक यंत्र, स्लायडिंग दरवाजा,एअर प्यूरिफायर, चपला ठेवण्यासाठी वेगळे कप्पे आहेत. १४० पॉड असलेल्या या हॉटेलात २४ बाथरूम असून १० वेगळे टॉयलेट व एक कॉमन वॉशरूम आहे. यात कॅफेटेरिया असून मीटिंग, लॅपटॉपवर काम करण्याची सोय आहे. 

 

सिंगापुरातील कंपनीने केली हॉटेलची रचना 
अर्बन पॉड हॉटेलचे संपूर्ण डिझाइन आणि इंटेरियर सिंगापूरमधील प्रख्यात आर्किटेक्ट कंपनी फ्रॉमवेर्क ने केले आहे. हिरेन गांधी यांनी सांगितले, मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना चांगले परंतु स्वस्त हॉटेल हवे असते. कधी-कधी ट्रांझिटमध्ये असणाऱ्यांनाही एखादी रात्र काढण्यासाठी जागा हवी असते. स्वच्छ, वाय-फायसह अन्य सुविधा त्यांना लागतात. हे लक्षात घेऊनच आम्ही पॉड हॉटेलची सुरुवात केली आहे. महिलाही एकट्या बाहेर जातात. ही बाब लक्षात घेऊन आम्ही महिलांसाठी १८ पॉडचा एक वेगळाच कक्ष तयार केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...