आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या समुद्रात क्रूझ रेस्टाॅरंट बुडाले, कामगारांना वेळीच बाहेर काढल्याने जीवितहानी टळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- वांद्रे-वरळी सी लिंकजवळ तरंगते आलिशान ‘आर्क डेक बार’  हे क्रूझ रेस्तराँ शुक्रवारी बुडाले. मात्र बोटीवरील १५ कर्मचाऱ्यांना आधीच बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.

 

मुंबईत सी लिंकजवळील थरार
शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास अरबी समुद्रात उंच लाटा उसळल्या. या लाटांचे पाणी या क्रूझ रेस्तराँमध्ये शिरले. भरती अाणि उंच लाटांमुळे     वांद्रे जेट्टीला लावण्यात अालेला नांगर निसटला अाणि ही बोट समुद्राच्या आत वाहत जात हळूहळू बुडू लागली. नंतर एका दगडाला धडकल्यामुळे बोटीचा खालचा भाग फुटला. त्यामुळे आतमध्ये समुद्राचे पाणी शिरून बोट एका बाजूला कलंडून बुडाली.

 

सी-लिंकवरून जाणाऱ्या व्यक्तीने कळवले
वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात असलेल्या एका व्यक्तीने बोट कलंडत असल्याचे पाहून अग्निशामक दलास फोन केला. ही माहिती तटरक्षक पोलिसांना देण्यात आली. यानंतर बोटीतील कर्मचाऱ्यांना छोट्या माेटारबोटीने किनाऱ्यावर आणण्यात आले.

 

मेकुने चक्रीवादळाचा परिणाम? 

काही जणांनुसार मेकुने चक्रीवादळामुळे समुद्राला आलेल्या उधाणामुळे ही बोट कलंडून बुडू शकते. मात्र तज्ज्ञांनी याला दुजोरा दिलेला नाही.

 

 

बातम्या आणखी आहेत...