आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उकाड्याने हैराण झाल्याने मागवली होती लस्सी, बारा कामगारांची प्रकृती बिघडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शहरातील चारकोप भागातील एक कंपनीतील 12 कामगारांची प्रकृती लस्सी प्यायलाने बिघडल्याच्या प्रकार समोर आला आहे. या सर्वांना चारकोपच्या शिवम आणि अथर्व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी संध्याकाळी घडला असून पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत.

 

चारकोपच्या हिंदुस्थान नाक्याजवळ एक बक्कल कंपनी आहे. उकाड्याने हैराण झालेल्या या कामगारांनी काही पैसे जमा करत जवळच्या दुकानातून लस्सी मागवली. ती प्यायल्या नंतर अचानक दोघांची तब्बेत बिघडली. त्याला उलट्या होऊ लागल्याने इतरांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करविले. डॉक्तरने त्याला तपासत अन्य कामगारांना देखील रुग्णालयात ऍडमीट करुन घेतले. 'माझी पत्नी महादेवी सुनगार (३८) हिला देखील लस्सी प्यायल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने तिला आम्ही ऍडमिट करविले. वीस वीस रुपये जमा करून त्यांनी लस्सी मागवली होती, ज्यानंतर तिची प्रकृती बिघडली', अशी माहिती महादेवी यांचे पती हनुमंता यांनी दिली. पोलिसांनी या लस्सीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत.

बातम्या आणखी आहेत...