आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंतदादा पाटील यांचा आज 29 वा स्मृतिदिन: वाचा राज्याला दिशा देणा-या नेत्याविषयी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटील.... - Divya Marathi
माजी मुख्यमंत्री वसंदादा पाटील....

मुंबई- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचा आज 29 वा (1 मार्च 1989) स्मृतिदिन आहे. राज्याला प्रगतीकडे नेणारा मुख्यमंत्री अशी वसंतदादांची ओळख आहे. सहकार, शेती, शिक्षण, औद्योगिक प्रगत महाराष्ट्राचे शिल्पकार राहिलेले वसंतदादा ख-या अर्थाने युग प्रवर्तक होते. 1977 ते 1985 या कालखंडात दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा जनतेच्या मनातील ख-या अर्थाने 'दादा' होते. दादांनी आपल्या काळात महाराष्ट्राला एक संस्थात्मक राज्य बनविले. सहकार क्षेत्रात आज महाराष्ट्र जो काही त्यांत वसंतदादांचे मोठे योगदान आहे. 

 

पाणी आडवा पाणी जिरवा हा मंत्र वसंतदादांनीच दिला. दादांचे शिक्षण कमी होते पण महाराष्ट्रातील खेडोपाड्यात शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षणसंस्था काढण्याचा मार्ग त्यांनीच दाखवला. त्याचमुळे महाराष्ट्र आज शिक्षण, सहकार, शेती क्षेत्रात अग्रेसर आहे. सहकार, शेती, शिक्षण क्षेत्राला निर्णायक वळण देणारे व आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत महाराष्ट्राला विकासाकडे नेणारे वसंतदादा पाटील यांची कर्मभूमी व जन्मभूमी सांगली.

 

वसंतदादांचा जन्म सांगलीतील मिरज तालुक्यातील पद्माळे या गावात 13 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. वसंतदादा पाटील हे सर्वसामान्य जनतेला आपले नेते वाटायचे. शेतकरी वर्गातून पुढे आलेल्या दादांना सत्तेचा दर्प कधीच चढला नाही. ते सर्वांशीच प्रेमाने व आपुलकीने वागत समोरच्यावर विश्वास टाकायचे. त्यांच्यासोबत काम केलेले सर्व नेते, पदाधिकारी सांगतात की, ते नेहमीच मोकळे-ढाकळे वागायचे व तसेच राहायचे. त्यामुळेच त्यांनी अनेक लोक जोडली गेली होती.

 

वसंतदादा पाटील एक बहुआयामी व्यक्तीमत्व-

 

- महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत.
- क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो. 
- त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. 
- सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले. 

 

25 वर्षे केले सांगलीचे प्रतिनिधित्त्व-

 

- वसंतदादा स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीत ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे 25 वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. 
- राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. 
- सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी,असे दादांबद्दल म्हटले जाते. महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले.

 

वसंतदादांनी राज्याच्या विकासविषयक आढावा घेण्यासाठी सत्यशोधन समिती नेमली, त्यातून विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) संज्ञा पुढे आल्या-

 

- १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. 
- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली.
- वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या.

 

वसंतदादांचा थोडक्यात परिचय-

 

- वसंतदादांचा जन्म मिरज तालुक्यातील पद्माळे या गावात 13 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. 
- वसंतदादांनी मुख्यमंत्रीपद 17 मे 1977 ते 18 जुलै 1978 आणि नंतर 2 फेब्रुवारी 1983 ते 1 जून 1985 या कालखंडात ते महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिले.
- त्याआधी ते 1972 मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.
- 1985 ते 1987 या काळात ते राजस्थानचे राज्यपाल राहिले. 
- 1 मार्च 1989 रोजी वसंतदादांचे मुंबईत निधन झाले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, लोकनेता वसंतदादांशी संबंधित फोटोज....

बातम्या आणखी आहेत...