आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रविण तोगडियांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा, भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ अहमदाबाद- विश्व हिंदू परिषद (विहिंप)चे माजी अध्यक्ष डॉ. प्रविण तोगडिया यांचे तिस-या दिवशी उपोषण सुरूच आहे. तोगडिया विहिंपच्या कार्यालयात उपोषण करत आहे. त्यांचे तीन किलो वजन कमी झाले आहे. डॉक्टर त्यांच्या तब्बेतीवर लक्ष ठेऊन आहेत. दरम्यान, तोगडिया यांच्या उपोषणाला पाटीदार समाजाचा नेता (पास) हार्दिक पटेलने पाठिंबा दिला आहे. 

 

दुसरीकडे, शिवसेनेनेही प्रविण तोगडिया यांना समर्थन दिले आहे. राजस्थान व गुजरातमधील शिवसेनेच्या 20 नेत्याच्या शिष्टमंडळाने तोगडिया करत असलेल्या उपोषणस्थळी जाऊन समर्थन दिले. यात महाराष्ट्रातील ताही शिवसेनेच्या पदाधिका-यांचा समावेश होता. उपोषणाच्या दुस-याच दिवशी तोगडियांच्या समर्थकांनी शिवसेनेने पाठिंबा दिलेले निवेदन व पत्रक लोकांत वाटली होती. दरम्यान, हार्दिक पटेलसह शिवसेनेने तोगडियांना दिलेल्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. भाजप नेते सुरेंद्र पटेल यांनी तोगडियांची भेट घेऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही.

 

प्रविण तोगडिया अहमदाबादमधील पालडी भागातील विश्व हिंदू परिषदेचे मुख्यालय असलेल्या डॉ. वणकर भवनाच्या बाहेर मंगळवारपासून उपोषणाला बसले आहेत. तोगडिया यांनी पुन्हा एकदा अयोध्यात राम मंदिर बांधण्याची जोरदार मागणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. तोगडिया म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक भांडण किंवा शत्रूत्त्व नाही ना मला पंतप्रधानपदाची खुर्ची पाहिजे. पण भाजप, आरएसएस व विहिंपने गेली अनेक वर्षे जे मुद्दे किंवा आश्वासने दिली आहेत ती पाळावीत. मी जेव्हा हे मुद्दे उपस्थित केले तेव्हा मला विहिंपमधून धक्के देऊन बाहेर काढले. भावुक होत तोगडिया म्हणाले की, मी वयाच्या नवव्या वर्षी हिंदू समाजासाठी घर सोडले. अहमदाबादमध्ये स्थिर वैद्यकीय व्यवसाय व कुटुंबियांना सोडून हिंदू समाजाच्या हितासाठी झडत आहे.

 

पुढे वाचा, उद्धव ठाकरेंनी तोगडियांना का दिला पाठिंबा....

बातम्या आणखी आहेत...