आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील किल्ले प्लास्टिकमुक्त करणार, गिर्याराेहकांनी उचलला 5 टन कचरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पाच जून राेजी असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे अांतरराष्ट्रीय यजमानपद ‘युनेस्काे’ने भारताकडे सुपूर्द केले अाहे. ‘प्लास्टिक प्रदूषणाशी लढा’ ही संकल्पना घेऊन भारत या दिनाचे अांतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणार अाहे. ५ जून राेजी रायगड किल्ल्यावर हाेणारा शिवराज्याभिषेक साेहळा अाणि पर्यावरण दिनाचे अाैचित्य साधून राज्यातील गडकिल्ले     प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प साेडण्यात येणार अाहे. या उपक्रमाचा प्रारंभ रायगड किल्ल्यापासून हाेत अाहे.  


या प्लास्टिकमुक्ती उपक्रमाची संकल्पना विशद करताना श्रीशिवराज्याभिषेक समितीचे कार्याध्यक्ष सुमी ताठेले म्हणाले, युनेस्काेने यंदा पर्यावरण दिनासाठी प्लास्टिक हा विषय निश्चित केला अाहे. युनेस्काेने यंदा भारताला दिलेल्या यजमानपदाचे अाैचित्य साधून पुण्यातील टेरी अाणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नातून रायगड प्लास्टिकमुक्त करण्याबराेबरच राज्यातल्या अन्य गड किल्ल्यांना प्लास्टिक कचऱ्याच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या माेहिमेला प्रारंभ करण्यात येणार आहे.

 

किल्ले रायगडाला दरवर्षी सुमारे ४ ते ५ लाख पर्यटक भेट देतात. प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या-पिशव्यांच्या कचऱ्याने या एेतिहासिक किल्ल्याला वेढले अाहे. त्यावर उपाययाेजना करण्यासाठी रायगड जिल्हा परिषद अाणि ग्रामपंचायतीने “२५ रुपये डिपाॅझिट भरा, प्लास्टिकची बाटली गडावर न्या, गडावरून खाली येताना प्लास्टिकची बाटली परत करा, पैसे परत घ्या,’ अशी याेजना अाखली हाेती. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण थाेडेफार कमी झाले.  परंतु अद्याप किल्ला पूर्ण कचरामुक्त झालेला नाही. त्याचाच एक भाग म्हणूनही प्लास्टिकमुक्त रायगड उपक्रम राबवण्यात येत असल्याचे ताठेले यांनी सांगितले.

 

सर्व गडकिल्ल्यांवर राबवणार माेहीम  
प्रतापगड, सिंहगड, ताेरणा, प्रबळगड, वासाेटा अादी किल्ल्यांवर याअगाेदरच प्लास्टिकमुक्तीचे काम सुरू झाले अाहे. शनिवार अाणि रविवारी स्थानिक संस्थांच्या मदतीने हे काम चालते. परंतु अाता लवकरच राज्यातल्या अन्य गड किल्ल्यांवरदेखील ही माेहीम राबवण्यात येणार असल्याचे ताठेले यांनी सांगितले.

 

२१ गावेही हाेणार प्लास्टिकमुक्त  
केवळ रायगड किल्लाच नाही तर जवळपासच्या परिसरातील २१ गावेही प्लास्टिकमुक्त करण्यात येणार अाहेत. अापापल्या गावातील प्लास्टिक गाेळा करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात अाली अाहे. ही माेहीम राबवण्यासाठी सरपंच अाणि ग्रामपंचायतीवर जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे.

 

प्लास्टिकमुक्त गडाची हाेणार पाच जूनला अधिकृत घाेषणा
प्लास्टिकमुक्त रायगड उपक्रमाची अधिकृत घाेषणा पर्यावरण दिनाच्या दिवशी हाेणार असली तरी त्याची प्राथमिक सुरुवात अगाेदरच झाली अाहे. प्रशिक्षित गिर्याराेहक संस्थांच्या मदतीने अवघड दरी, कडे व उतारावरून ४ ते ५ टन प्लास्टिकचा कचरा उचलण्यात अाला आहे. गडावरील टकमक टाेक अाणि हिरकणी बुरुजावरून फेकलेला प्लास्टिकचा कचरा कधीच साफ झाला नव्हता. ताे कचरा या दाेन दिवसांमध्ये साफ करण्यात आला आहे. ५ जून राेजी रायगड किल्ल्यावरील वरचा संपूर्ण भाग स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...