आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलप्रवासाला प्रोत्साहन; मुंबईत दीड वर्षात 300 काेटींचे क्रूझ टर्मिनल, देशात 10 हजार सी-प्लेन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे  नवीन आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे भूमिपूजन गुरूवारी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ३०० काेटी खर्चून जून २०१९ पर्यंत ४.१५ लाख चाैरस फूट क्षेत्रात हे टर्मिनल उभारण्यात येणार अाहे. 


पूर्वी फक्त विशिष्ट लोकांसाठी खुला मुंबई पोर्ट ट्रस्टचा भाग आता सामान्य लोकांसाठी खुला होत आहे. कोस्टल रोड, सी प्लेन, रोरो सेवा, प्लोटींग रेस्टॉरन्ट बराेबरच अाता आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल सुरू झाल्यास  देश - विदेशातील अधिक पर्यटक महाराष्ट्राकडे अाकर्षित हाेतील. राेजगारही वाढलेल. त्यामुळे राज्याच्या जीडीपी वाढीमध्ये मोठे योगदान मिळेल, अशी अाशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. रयावेळी कोचीन शीप यार्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामध्ये जहाज दुरुस्तीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. ‘क्रुझ पर्यटनाला मुंबईत मोठा वाव आहे. मात्र सध्या मुंबईत दरवर्षी फक्त ८० क्रुझ येतात. त्यातून २ लाखच पर्यटक येतात. भविष्यात ही संख्या वार्षिक साधारण ९५० क्रुझेस व ४० लाख पर्यटकांपर्यंत वाढविण्याचे आमचे ध्येय आहे.

 

त्यासाठीच  क्रुझ टर्मिनलचे काम आम्ही हाती घेतले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन महाराष्ट्राच्या व मुंबईच्या विकासात महत्वाचे योगदान दिले जाईल’, असे गडकरी म्हणाले.
 केंद्र व राज्याच्या सहभागातून पर्यटनविषयक विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा, वन्यजीव, जंगले, गड किल्ले, लेण्या, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इमारती असा पर्यटनाचा मोठा वारसा आहे. हा वारसा जागतिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबईला क्रुझ पर्यटनाचे होम पोर्ट बनविण्यात येईल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले.

 

३६५ दिवस सुरू राहील
जून २०१९ पर्यंत हे क्रुझ टर्मिनल सुरू करण्याचे सरकारचे प्रयत्न अाहेत. वर्षातील ३६५ ही दिवस ते कार्यान्वित असेल. देशातील ८० टक्के क्रुझ प्रवाशांची या टर्मिनलमधून ने- आण करण्यात येईल. तळमजला अधिक तीन मजले असे या टर्मिनलचे स्वरुप असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या टर्मिनलमुळे मुंबईतील आयकॉनिक इमारतींमध्ये अजून एका भव्य इमारतीची भर पडणार आहे. 

 

राेराे सेवाही सुरू हाेईल एप्रिल महिन्यापासून
> मुंबईतील रोरो टर्मिनल चे काम २५ मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल. साधारण एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्यात येईल.
> मांडवा, नेरुळ येथे रोरो सेवेच्या माध्यमातून वाहने गेल्यास वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ शकेल.
> मेट्रोच्या कामातून निघणाऱ्या मातीचा उपयोग करून सागरी भराव तयार करून उद्यान तयार करण्याची सूचनाही नितीन गडकरी यांनी केली.
> सागरमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात २.४१ लाख कोटींच्या ८६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.
> जेएनपीटीमधील सेझ प्रकल्पात मोठी गुंतवणूक येत अाहे. यातील ८० ते ९० टक्के रोजगार हे स्थानिकांना मिळतील.

 

काय आहेत या क्रूझ टर्मिनलची ठळक वैशिष्ट्ये-

- 4 लाख स्क्वेयर फूटमध्ये पसरलेले असेल हे क्रूज

- पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा
- प्रति वर्षी सात लाख प्रवाशांच्या सुविधेसाठी रिसेप्शन, चेक-इन, इमिग्रेशन आणि सुरक्षा व्यवस्था.
- सर्व 365 दिवस दिवसांकरिता उपहारगृहे, भोजन कक्ष आणि रिटेल आऊटलेट्स नागरिकांसाठी उपलब्ध
- एकाच वेळी 5000 प्रवाशी या टर्मिनलमध्ये ये-जा करू शकतात.
- हे टर्मिनल पीपीपी या तत्त्वावर काम करेल. यातून देशाला आर्थिक वृद्धीसोबत रोजगार उपलब्ध होतील.
- मुंबई जागतिक पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे येईल.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, आजच्या कार्यक्रमादरम्यानचे फोटोज....

बातम्या आणखी आहेत...