आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर- केळवे येथील समुद्रात सात पर्यटक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला, तिघांचा शोध सुरु

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघर- पर्यटनासाठी आलेल्या सात पर्यटक केळवे येथील समुद्रात बुडाले असून त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे तर एकाचा मृतदहे सापडला आहे, अन्य तिघांचा शोध सुरु आहे. बुडालेले सर्व पर्यटक हे नालासोपारा येथील राहणारे आहेत.  रविवारची सुट्टी असल्यामुळे आज केळवे बीचवर सकाळपासून पर्यटकांची गर्दी होती. समुद्र खवळेला असतानाही काही पर्यटक पाण्यात उतरले होते. यापैकी चौघेजण बुडाले. 

 

मिळालेल्या माहितीनुसार  नालासोपा-यात राहणारी 15 ते 20 वयोगटातील 7 मुले फिरण्यासाठी आली होती. आज दुपारी अडीच वाचताच्या सुमारास ही मुले पोहण्यासाठी समुद्रात गेली होती. यातील गौरव भिकाजी सावंत (१७), संकेत सचिन जोगले (१७) आणि देविदास रमेश जाधव (16) या तिघांना वाचवण्यात यश आले आहे. तर, दिपक परशुराम चालवाडी (20) याचा मृतदेह सापडला आहे. दिपेश दिलीप पेडणेकर (17), श्रीतेज नाईक (15) आणि तुषार चिपटे (15) यांचा अद्यापही शोध सुरू आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...