आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 राज्यातील पोलिस पकडू शकले नाहीत या आरोपीला पण मराठी मुलीने करुन दाखवलं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाय प्रोफाईल लाईफस्टाईल असणारा विशाल मोदी उर्फ राहुल फ्रेचायसी देण्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालायचा. - Divya Marathi
हाय प्रोफाईल लाईफस्टाईल असणारा विशाल मोदी उर्फ राहुल फ्रेचायसी देण्याच्या नावाखाली लोकांना गंडा घालायचा.

मुंबई/नागपूर- नोकरीच्या आमिषाने लोकांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला 5 राज्याचे पोलिस पकडण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना अपयश येत होते. पण हेच काम एका मराठी मुलीने अतिशय चातुर्याने करुन दाखवलं. 

 

 

असे पकडले आरोपीला
- नागपूरची राहणारी ही युवती एमबीबीएस करत आहे. एमबीबीएस करत असतानाच तिला एका कंपनीची जाहिरात दिसली. या जाहिरातीत केवळ 3 लाखाची गुंतवणूक करा आणि लाखो रुपये कमवा असे म्हटले होते.
- या मुलीने या कंपनीशी संपर्क केला असता तिला नोयडा येथे मुलाखतीसाठी बोलविण्यात आले. तिथे तिची भेट नदीम खानसोबत झाली. त्याने तिची मुलाखत घेतली.
- त्यानंतर कंपनीचा मालक विशाल मोदी उर्फ राहुल याच्या सांगण्यावरुन तिने त्यांना एक धनादेश दिला. हे पैसे जमा करण्यासाठी तिने आपले दागिने व कॉलेजचे शुल्कही एकत्र केले व त्याला दिले.
- त्यांनी 4 महिने तिला वेगवेगळी आश्वासने दिली. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. ती नोयडा येथे गेली असता त्यांनी तेथील कार्यालय बंद केल्याचे तिला समजले. तिथे अशा पध्दतीने अनेकांची फसवणुक झाल्याचे तिच्या लक्षात आले. 
पोलिसांनी तेथील कर्मचाऱ्यांना अटक केली होती. पण मालक आणि अन्य लोक गायब झालेले होते.

 

 

फेसबुकवर बनवले बनावट खाते
- त्यानंतर या युवतीने फेसबुकवर बनावट अकाऊंट बनवले. त्यानंतर तिने आरोपीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर त्याने तिला रायपूरमधील एका हॉटेलमध्ये बोलवले. तिथे तरुणी आणि तिची मैत्रिण गेली. तिथे गेल्यावर या तरुणीच्या मैत्रिणीने बाथरुममध्ये जाऊन पोलिसांना फोन केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...