आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\' मंत्री गिरीश बापटांना वास्तवाची जाण, ते खरं बोलून गेले\'; बापटांवर कारवाई करा- संजय काकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आपलं सरकार डिसेंबरपर्यंत आहे. पुढं कोणतं सरकार येईल हे आता सांगू शकत नाही. पण आपली जी काही कामे असतील ती करून घ्या असे धक्कादायक वक्तव्य पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार आणि बापटविरोधक मानले जाणा-या संजय काकडे यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही बापटांना चार खडे बोल सुनावले आहेत. एकीकडे भाजपात बापट यांच्या वक्तव्याची चिरफाड होत असताना विरोधकांनीही तापलेल्या तव्यावर पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांनी बापट खरे बोलून गेले असे म्हटले आहे.

 

अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या दोनदिवसीय वार्षिक अधिवेशन व राष्ट्रीय डाळिंब परिसंवादाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी बापटांनी पुढं आपले सरकार येईल की नाही असे वक्तव्य केले. त्यानंतर बापटविरोधक मानले जाणारे संजय काकडे यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही. तसेच काकडे आणि बापट यांच्यातील वर्चस्वाची लढाई कायम असल्याचे समोर आले आहे.

 

संजय काकडे म्हणाले, मंत्री गिरीश बापट यांनी आमचं सरकार पुढे येणार नाही हे कोणत्या बाबींवरून म्हटले माहित नाही. याचा त्यांच्याकडे काही अभ्यास आहे का याचीही माहिती नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने विकासाची कामे करत ते पाहता 2019 नंतरही आमचंच सरकार पुन्हा नक्की येणार आहे. तसेच सध्याच्या सरकारलाही कोणताही धोका नाही. शिवसेना व भाजपचे इतके संबंध बिघडले नाहीत की त्यांनी पाठिंबा घ्यावा. आगामी काळात शिवसेना-भाजप एकत्रच असेल. 2019 साली राज्यात आमच्या 170 ते 185 जागा येतील असा मला विश्वास आहे असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

 

बापट आणि काकडे यांच्यातील वर्चस्वाची लढाई पुणेकरांना माहित आहे. पुणे महापालिकेतील सत्तावर्चस्वातून या दोघांत शीतयुद्ध सुरू आहे. गुजरात निवडणुकीवेळी भाजपचा पराभव होईल असे भाकीत खासदार संजय काकडे यांनी वर्तविल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच सदाशिव पेठेत पुणेरी पाटी लावत प्रत्येक दिवस 'काक' डे ठरत नाही अशी तिरकस टिप्पणी केली होती.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, सुप्रिया सुळे, पृथ्वीराज चव्हाण नेमके काय म्हणाले बापटांच्या वक्तव्यावर.....

बातम्या आणखी आहेत...