Home | Maharashtra | Mumbai | Girl From Mumbai Found At A MP Railway Station Reveals Her Shocking Story

'ताई-भाऊजींनी विकले होते, मी पळून आले!' स्टेशनवर रडणाऱ्या चिमुकलीची आपबिती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 26, 2018, 06:07 PM IST

मूळची बिहारमध्ये राहणारी ही मुलगी सख्ख्या ताई आणि भाऊजींच्या मुंबईत येथील घरी गेली होती. ताईने तिची विक्री केली.

 • Girl From Mumbai Found At A MP Railway Station Reveals Her Shocking Story

  मुंबई / ग्वाल्हेर - मध्यप्रदेशच्या ग्लाल्हेर जिल्ह्यातील डबरा रेल्वे स्टेशनवर आरपीएफ जवानांना एक 12 वर्षीय मुलगी रडताना दिसून आली. जवळ जाऊन तिची चौकशी केली असता आपण मुंबईत मिळेल त्या ट्रेनमध्ये बसून पळून आलो असा खुलासा तिने केला. मूळची बिहारमध्ये राहणारी ही मुलगी आपल्या सख्ख्या ताई आणि भाऊजींच्या मुंबईत येथील घरी गेली होती. त्याच ठिकाणी ताईने काही पैशांच्या बदल्यात तिची 4 जणांना विक्री केली होती. विकत घेणारे 4 जण तिला घेण्यासाठी ताईच्या घरी आले होते. त्याचवेळी आपण मिळेल त्या ट्रेनमध्ये बसून पळून आलो अशी आपबिती तिने पोलिसांना सांगितली आहे.


  ताईच घेऊन गेली होती मुंबईला...
  अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती मूळची बिहार येथील रहिवासी आहे. तिची बहिण आपल्या पतीसोबत मुंबईत राहते. 3 महिन्यांपूर्वी तिची आरोपी बहिण बिहारला गेली होती. परतताना ती आपल्यासोबत आई आणि या 12 वर्षांच्या मुलीला घेऊन मुंबईला पोहोचली. काही दिवसांपूर्वीच ताई आणि आईचे जोरदार भांडण झाले. यानंतर आई बिहारच्या घरी परतली. परंतु, पीडित मुलगी ताईच्याच घरी होती. या दरम्यान ताई आणि भाऊजींनी काही रुपयांच्या बदल्यात जालंधर येथील 4 जणांना विकले. हेच चौघे बुधवारी तिला घेऊन जाण्यासाठी आले होते. परंतु, त्या सर्वांना चकवा देत तिने पळ काढला आणि रेल्वे स्टेशनला जाऊन एका ट्रेनमध्ये बसली.


  पोलिस काय म्हणाले..?
  आरपीएफ चौकीचे प्रभारी नंदलाल मीणा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बुधवारी सकाळी 9 च्या सुमारास ते रेल्वे स्टेशनवर रुटीन गस्त लावत होते. त्याचवेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक 12 वर्षांची मुलगी रडताना दिसून आली. त्यांनी मुलीच्या जवळ जाऊन चौकशी केली तेव्हा तिने आपली आपबिती मांडली. यानंतर आरपीएफने चाइल्डलाइनला फोन करून या मुलीची रवानगी केली. तसेच चाइल्डलाइन या मुलीच्या आईचा शोध घेत आहेत.

Trending