आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे शालेय अभ्यासक्रमात द्या;विद्या चव्हाण यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अात्मसंरक्षण करता येणे अत्यंत आवश्यक असून याचे धडे त्यांना अभ्यासक्रमातच देण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. त्या म्हणाल्या, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर स्थापन झालेल्या वर्मा आयोगाने अनेक नवीन चांगले कायदे केले. मुली किंवा महिलांबाबत अत्याचाराच्या घटना घडल्यास गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे. परंतु मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.


साेशल मीडिया, फेसबुक, इंटरनेटच्या भडिमारामुळे मुलांवर जे संस्कार व्हायला पाहिजेत, ते हाेत नाहीत. वाहिन्यांवरील अश्लील गाणी, मालिका यांचा घातक परिणाम मुलांवर हाेत अाहे. मुले सकाळी शाळेत जातात अाणि संध्याकाळी क्लासवरून उशिरा घरी येतात. अनेकांचे पालकही कामावरून उशिरा घरी परतात. अशा परिस्थितीत केवळ मुलीच नाही तर मुलांनाही स्वसंरक्षणाची करण्याची गरज अाहे. त्यामुळे या प्रशिक्षणाचा समावेश शालेय अभ्यासक्रमातच हाेणे गरजेचे असल्याचे त्यांनी अाग्रहपूर्वक सांगितले.

बातम्या आणखी आहेत...