आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणीबाणीवेळी तुरुंगात गेलेल्या गुंडांनाही पेन्शन द्या - नवाब मलिक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना मिसाअंतर्गत स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे पेन्शन देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्या काळात मिसाअंतर्गत हाजी मस्तान आणि अन्य कुख्यात स्मगलरही तुरुंगात गेले होते. मग, मिसामध्ये आत गेलेले सर्वच आता स्वातंत्र्यसैनिक होणार काय आणि त्यांना पेन्शन देणार काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकारला केला आहे. 


 आणीबाणीवेळी तुरुंगवास भोगणाऱ्यांना पेन्शन देण्याच्या सरकारच्या निर्णयावेळी शिवसेनेची काय भूमिका होती आणि या प्रस्तावाला शिवसेनेचा विरोध होता की त्यांनी पाठिंबा दिला? पाठिंबा दिला तर बाळासाहेबांची भूमिका चुकीची होती, हे शिवसेनेने स्पष्ट केले पाहिजे. शिवाय, सरकारने आणीबाणीमध्ये मिसा कायद्याअंतर्गत जे तुरुंगात गेले त्यांना दहा हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय होत असताना शिवसेनेची भूमिका काय होती, हे शिवसेनेने स्पष्ट करावे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...