आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमोनिया गॅसचा टॅंकर उलटल्यानंतर वॉस्को-गोवा महामार्ग बंद; 2 महिलांची प्रकृती गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉस्को-पणजी महामार्ग या अपघातानंतर ठप्प झाला आहे. - Divya Marathi
वॉस्को-पणजी महामार्ग या अपघातानंतर ठप्प झाला आहे.

मुंबई- वॉस्को-पणजी महामार्गावर शुक्रवारी चिकलिम गावाजवळ अमोनियाचा टॅंकर उलटला. टॅंकरमधून गॅस गळती होऊ लागल्याने संपुर्ण गाव रिकामे करण्यात आले आहे. गॅस गळतीमुळे त्रास होऊ लागल्याने 2 महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. हा टॅंकर आरी फॅक्टरीकडे चालला होता. 

 

 
महामार्गही ठप्प

- उपजिल्हाधिकारी महादेव अरोंदेकर यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाल्यावर आपत्ती व्यवस्थापन पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. पोलिस आणि अग्निशामक दलाने गाव रिकामे करुन घेतले आहे.

- एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की श्वसनास त्रास होत असल्याने 2 महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- आरी फॅक्टरीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांशीही संपर्क करण्यात आला असून त्यांनी एक पथक घटनास्थळी पाठवले आहे.

 

 

मास्क वापरण्याचे आवाहन 
- चिकालिम गावातुन जाणारा महामार्ग बंद करण्यात आला असून येथे जवळपास 330 घरे आहेत. तर दोबेलिम हवाई तळ येथून काही किलोमीटर आहे. 
- या घटनेनंतर नागरिकांना मास्क वापरण्यास सांगण्यात आले आहे आणि चेहरा ओल्या कपड्याने झाकण्यास सांगण्यात आले आहे.  

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती