आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिले 'IIT'ian CM आहेत पर्रीकर, स्कूटरवर फिरतात मतदारसंघात...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आज 62 वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त गोव्यात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्रीकर साधेपणाने राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र ते कधीही हे कोणाला सांगत नाहीत की गाजावाजा करीत नाहीत. ते वाढदिवसही साजरा करीत नाहीत. मात्र, अलीकडच्या काळात लहान मुलांसमवेत वाढदिवस साजरा करतात.

 

मुंबईतील (पवई) आयआयटीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले पर्रीकर यांची ओळख एक प्रामाणिक व कार्यक्षम नेता अशी आहे. प्रशासनावर असणारी मजबूत पकड ही त्यांची जमेची बाजू आहे. निर्णय घेण्यास सक्षम, उत्साही व उमदे नेतृत्त्व, संघाची तनामनात असलेली शिस्त आदी बाबींसह पर्रीकरांची स्वच्छ प्रतिमा पंतप्रधान मोदींच्या नजरेत भरली होती. त्यामुळेच मोदींनी त्यांना संरक्षण सारखे संवेदनशील खाते दिले होते. मात्र, आता पर्रीकर यांनी केंद्रात सुमारे दोन वर्षी संरक्षणमंत्रीपद भूषविल्यानंतर यावर्षी पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री राज्यात परतले आहेत. यशवंतराव चव्हाण, शरद पवार व प्रमोद महाजन (केवळ 13 दिवस) यांच्यानंतर ते चौथे मराठी संरक्षणमंत्री ठरले होते.

 

साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत पर्रिकर-

 

- गोव्याचे तीनदा मुख्यमंत्री बनलेले मनोहर पर्रीकर आपल्या साध्यापणासाठी प्रसिद्ध आहेत. 
- 2000 साली ते सर्वप्रथम मुख्यमंत्री झाले त्यानंतर 2012 आणि 2017 मध्ये त्यांनी दुस-यांदा आणि तिस-यांदा या पदाची शपथ घेतली. 
- गोव्यातील सर्वोच्च पद हातात असतानाही आपल्या राज्याचा दौरा करताना आपल्या आमदारांसोबत ते खासगी वाहनाने प्रवास करायचे.

- त्यातही स्कूटरचा वापर करायचे. मुख्यमंत्री म्हणून ते कोणत्याही सरकारी अथवा खासगी कार्यक्रमात जातात तेव्हा ते सामान्य कपडे घालतात. 

 

सुरक्षा रक्षकाने उडविली होती थट्टा-

 

- याबाबत पर्रीकर यांच्या जवळच्या व्यक्तीने सत्य घडलेली घटना सांगितली ती अशी की, पर्रिकर एकदा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये चालले होते. 
- मात्र त्याचवेळी त्यांची कार खराब झाली. त्यांनी तत्काळ एक खासगी टॅक्सी बोलावली व साधे कपडे व चप्पल घातलेले मुख्यमंत्री हॉटेलवर पोहचले. 
- जेव्हा ते टॅक्सीतून उतरले व हॉटेलच्या गेटकडे जावू लागले तेव्हा त्यांना सुरक्षारक्षकांनी आडवले व सांगितले तुम्ही आता जाऊ शकत नाही. 
- तेव्हा पर्रिकरांनी मी गोव्याचा मुख्यमंत्री आहे असे सांगितले त्यावर तो सुरक्षारक्षक जोरजोरदार हसू लागला व म्हणाला, तुम मुख्यमंत्री है तो मैं देश का राष्ट्रपती हूं. 
- इतक्यात कार्यक्रमाचे आयोजक तेथे पोहचले व पुढील प्रकरण थांबले.

 

पर्रीकर मुंबईतील पवई आयआयटीचे पदवीधर-

 

- मनोहर पर्रिकर यांच्या नावावर देशातील पहिला आयआयटीयन मुख्यमंत्री होण्याचा विक्रम आहे. 
- मुंबईतील पवई आयआयटीचे ते पदवीधर आहेत. पर्रीकर यांच्यानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे सुद्धा आयआयटी पदवीधर आहेत. जे सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत.

 

पुढे आणखी वाचा, मनोहर पर्रीकर यांच्याविषयी...

बातम्या आणखी आहेत...