आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या उपचारांसाठी अमेरिकेला रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पुढील उपचारासाठी बुधवारी मध्यरात्री अमेरिकेला रवाना झाले. मुंबईत काही दिवस उपचार घेतल्यानंतर पर्रीकर गोव्यात परतले होते. मात्र, दोन दिवसापूर्वी पुन्हा त्यांना लिलावतीत आणले होते. मात्र, स्वादुपिंडावर भारतापेक्षा अमेरिकेत आधुनिक उपचार होत असल्याने त्यांना तेथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. काल रात्री 12 च्या सुमारास पर्रीकर यांना घेऊन एक विमान अमेरिकेकडे रवाना झाले. हा विमान प्रवास 24 तासाचा असल्याने त्यांची प्रकृती बिघडल्यास खबरदारी म्हणून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यासमवेत आहे.

 

मनोहर पर्रीकर यांनी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेयर केला होता. त्यात त्यांनी गरज भासल्यास अमेरिकेला उपचार करण्यासाठी जाण्याचे सुचोवात केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेतच उपचार होणार हे जवळपास निश्चित झाले होते.

 

आपल्या गैरहजेरीत राज्याची विकासकामे थांबू नयेत यासाठी त्यांनी तीन मंत्र्यांची एक समिती गठित केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि नगर विकासमंत्री फ्रांसिस डिसोझा या 3 वरिष्ठ मंत्र्यांच्या गटाकडे सर्वाधिकार सोपवण्यात आले आहेत. सोबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या प्रत्येक मंत्र्यांला 50 लाखांपर्यंतचा निधी खर्च करण्यास परवानगी दिली आहे.

 

मनोहर पर्रीकर यांना मागील महिन्यात 15 फेब्रुवारीला मुंबईतील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पोटात दुखत असल्याची तक्रार पर्रीकर यांनी केली होती.

बातम्या आणखी आहेत...