Home »Maharashtra »Mumbai» Government Not Aware Of Debt Waiver Farmers, Disclosed In RTI

कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही, RTI मध्ये उघड; केवळ 14 हजार 388 कोटी रुपये जमा

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने देऊ केलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थींची जिल्हानिहाय यादीच र

विशेष प्रतिनिधी | Apr 11, 2018, 04:44 AM IST

मुंबई -छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने देऊ केलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थींची जिल्हानिहाय यादीच राज्य शासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. आतापर्यंत राज्यातील एकूण ४६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १४ हजार ३८८ कोटींची रक्कम जमा केल्याची माहिती शासनाकडून प्राप्त झाली आहे.


मुंबईतील एक माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज केला होता. त्यानुसार त्यांनी कर्जमाफीचा लाभ झालेल्या एकूण शेतकऱ्यांची संख्या, एकूण मंजूर आणि नामंजूर अर्जाची संख्या, बँकेचे नाव, एकूण निधीचे वाटप तसेच लाभार्थींची जिल्हानिहाय माहिती राज्य शासनाकडे मागितली होती. यावर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे जन माहिती अधिकारी दि. म. राणे यांनी अर्जदाराला माहितीचे पत्र दिले. दिलेल्या पत्रात लाभार्थींच्या खात्यात जमा केलेल्या कर्जमाफीच्या रकमेबाबतची जिल्हानिहाय माहिती शासन स्तरावर उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले आहे. तसेच विदर्भातील गावनिहाय माहितीसुद्धा शासनस्तरावर उपलब्ध नसल्याचेही अर्जदाराला कळवले आहे.
शासनाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ३७ जिल्ह्यातून ५६ लाख ५९ हजार १५९ अर्ज छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शासनाकडे प्राप्त झाले. यात सर्वाधिक अर्ज अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. नगरमधील अर्जदारांची संख्या ३ लाख ३४ हजार ९२० इतकी आहे. तर १ हजार ६२० अर्जदार मुंबई उपनगर आणि २३ हजार ७१५ अर्जदार मुंबई शहरातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, यामुळे विरोधी पक्षांना सरकारवर तोंडसुख घेण्याची आयती संधी मिळणार आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, जिल्हा बँकांना देण्यात आले ७ हजार कोटी रुपये...

Next Article

Recommended